भाजप ने लोकसभेला आटपाडीतील देशमुखांना संधी द्यावी.. बाळासाहेब मेटकरी..
राजेंद्रअण्णा देशमुख,अमरसिंह देशमुख यांच्या नावाचा विचार व्हावा….
आटपाडी प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघात माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख किंवा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने संधी द्यावी.अशी मागणी भारतीय किसान मोर्चाचे अध्यक्ष बाळासो मेटकरी यांनी केली आहे.मेटकरी यांनी पक्षालाच थेट घरचा आहेर दिला आहे.
ते पुढे म्हणाले खानापूर आटपाडी मतदारसंघ दुष्काळग्रस्त मतदारसंघ म्हणून ओळखला जातो .माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख सन 1995 मध्ये विधान सभेला अपक्ष आमदार असताना मतदार संघाला टेंभू चे पाणी मिळावे म्हणुन भाजप सेनेच्या सरकारला पाठिंबा दिला होता. त्यानंतर आत्ता पर्यंत टेंभू योजनेची 50 ते70 टक्के काम पूर्ण झाले आहे.
1995 मधील सरकारमध्ये अपक्ष आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी टेंभू योजनेची कामे पूर्ण व्हावी. यासाठी आमदारकी पणाला लावली होती . आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या कार्यकाळात टेंभू योजनेचे काम सुरू झाले होते.
मुख्यमंत्री मनोहर जोशी व अख्खं मंत्रिमंडळ आटपाडी येऊन टेंभू योजनेसाठी रोखे काढले होते.त्यानंतर टेंभू योजनेची कामे सुरू झाली होती.
सांगली जिल्ह्याच्या राजकारणात सातत्याने खानापूर आटपाडी मतदार संघातील विकासासाठी झटणारे नेते म्हणून राजेंद्र अण्णा देशमुख यांची जिल्ह्यात सर्वत्र ओळख आहे. तसेच सर्व नेत्याशी सलोख्याचे संबंध आहेत. एक संयमी विकासाठी झटणारा नेता म्हणून म्हणून राजेंद्र अण्णांची ओळख आहे.
तसेच त्यांचे बंधू अमरसिंह देशमुख हे जिल्हा परिषद अध्यक्ष होते एक धडाडीचे नेते म्हणून जिल्ह्यात त्यांना ओळखले जाते .जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना विकास कामाच्या बाबतीत समान न्याय देण्याचे काम जिल्हा परिषद अध्यक्ष असताना केले आहे. शिक्षण समाजकारण राजकारण याचा अभ्यास असणारे अभ्यासू नेतृत्व म्हणून अमरसिंह देशमुख यांची ओळख आहे.
संपूर्ण तालुका ओलिताखाली आणण्यासाठी व तालुक्याचा सर्वागीण विकास करण्यासाठी लोकसभेत आटपाडी चे देशमुख जाणे गरजेचे आहे.तर आणि तरच जील्हाचा विकास होईल असेही मेटकरी म्हणाले.
तरी जिल्ह्यात जनतेला बदल हवा आहे हे ओळखून भारतीय जनता पक्षाने देशमुखांना लोकसभेसाठी संधी द्यावी अशी मागणी भारतीय किसान मोर्चा चे तालुका अध्यक्ष बाळासाहेब मेटकरी यांनी केली आहे .







