विभुतवाडी , गुळेवाडी येथे चारा डेपो सुरू करावा…सरपंच सुरज पाटील
तहसीलदार यांचेकडे निवेदनाद्वारे केली मागणी.
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी पश्चिम भागामध्ये विभूतवाडी परिसरात मुबलक पाऊस पडला नाही व टेंभूचे पाणी आले नाही त्यामुळे येथे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या तलाव ,विहिरी कोरडे पडले आहेत .तर जनावरांना चारा नाही पाऊस नसल्याने चारा सुकला आहे. शेतीमध्ये पाणी नसल्याने चारा उगवला नाही त्यामुळे सध्या जनावरांना चारा टंचाई भासू लागली आहे.
या सर्व गोष्टीचा विचार करून सरपंच सुरज पाटील यांनी तहसीलदार सागर ढवळे यांच्याकडे चार डेपो सुरू करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की विभूतवाडी, गुळेवाडी येथे गावात पुरेसा प्रमाणात पाऊस झाला नसलेने जनावरांसाठी चारा डेपो सुरु करणे गरजेचे असून गावात लवकरात लवकर जनावरांसाठी चारा डेपो सुरु करण्यात यावा. अशी मागणी तहसीलदार सागर ढवळे यांच्याकडे केली आहे.







