आपल्या माय बापाच्या डोळ्यातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाकडे लक्ष देऊन त्यांच्या कष्टाचं चीज करावे – शिवव्याख्याते – अॅड प्रितम निकम
त-हाडी येथे शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
त-हाडी- शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती त-हाडी तर्फे शिवजयंती निमित्त महाराष्ट्राचा युवा वक्ता अॅड प्रितम निकम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. युवा वक्ता अॅड प्रितम निकम यांच्या व्याख्यानाने उपस्थितांचे मने जिंकली. छत्रपती शिवरायांचा इतिहास ते आजची आपली परिस्थिती या विषयावर अॅड प्रितम निकम यांनी भाष्य केले. फेसबुक व्हाट्सअप ला कमी लाईक आल्या म्हणून रडत बसण्यापेक्षा आपल्या माय बापाच्या डोळ्यातील पाण्याच्या प्रत्येक थेंबाकडे लक्ष देऊन त्यांच्या कष्टाचं चीज करावं असे यावेळी सांगण्यात आले.
शिरपूर तालुक्यातील त-हाडी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज उत्सव समिती त-हाडी तर्फे,स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची दि.१९ फेब्रुवारी २०२४ रोजी ३९४ जयंती निमित्त युवा व्याख्यानकार अॅड प्रितम निकम यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी त-हाडी येथील नागरिक, विशेष करून शाळेतील मुलींची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. प्रथम हिन्दुस्तानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवजन्मोत्सवाला सुरवात करण्यात आली. यावेळी शिवव्याख्याते अॅड प्रितम निकम आपल्या विचारातून सांगितले की, आई वडील यांची कदर करा. संघर्ष, त्याग, स्वाभिमान जगण सार्थक करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच आई जिजाऊ यांना सर्वोच्च स्थानावर मानले होते. शिवराय आपल्या आईला आईसाहेब म्हणत, महाराजांच्या विचारांची चालना आजच्या पिढीने अवलंबली पाहिजे, शिवरायांचे विचार समोर ठेवून क्रांतिकारक जीवन जगले पाहिजे असे मोलविक विचार महाराष्ट्राचे प्रसिद्ध व्याख्यानकार अॅड प्रितम निकम यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळजचे तरुण तरुणी फेसबुक आणि व्हाट्सअप वर लाईक कमी आल्या तर रडतात. पण आईच्या डोळ्यातील स्वप्न साकार करत नाही.







