शिरपूर तालुक्यातील ८ केंद्रा वर ४२०३ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा…
कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा सरमिसळ पद्धतीचा अवलंब
पेपर सुरू झाल्यावर नो एण्ट्री; अर्धा तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक!
त-हाडी,ता.२० (प्रतिनिधी) इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची शालांत परीक्षा ता.२१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे.पेपर सुरू झाल्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही,अशा सूचना परीक्षा मंडळाकडून प्रत्येक केंद्राला देण्यात आल्या आहेत.
तालुक्यात ८ परीक्षा केंद्रांवर १२ वी च्या परीक्षा घेण्यात येणार आहे.या परीक्षा केंद्रांवर एकूण ४२०३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मंडळाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी यंदा सरमिसळ पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे एकच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी परीक्षेवेळी एकामागे एक नसणार आहेत.वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर त्यांचे क्रमांक असतील. विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्याच्या दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जायची.पण,आता ही पद्धत बंद करून पेपरच्या शेवटी दहा मिनिटांचा वाढीव वेळ दिला जाणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स सेंटर,संगणक क्लास पेपर होईपर्यंत बंद राहतील,असेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.भाषा विषयाशिवाय इतर विषयांच्या पेपरसाठी बोर्डाने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळेल,असे वेळापत्रक तयार केले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेबद्दल कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी,असे आवाहन ही परीक्षा मंडळाने केले आहे.
◼️ शिरपूर तालुक्यातील ८ केंद्रावर होणार परीक्षा
शिरपूर तालुक्यात या पूर्वी ७ परीक्षा केंद्र होते,आता त्यात एकाने भर पडली आहे.एकूण ८ केंद्रा पैकी
१) एसपीडीएम काॅलेज महाविद्यालय शिरपुर- १३३६
२) आर सी पटेल मेन बिल्डिंग हायस्कूल शिरपुर- ११०३
५)आण्णासाहेब साहेबराव पाटील महाविद्यालय त-हाडी – १८४
४)विद्यालय दहिवद- २२२
५) विद्यालय अर्थे -४३८
६) कन्या विद्यालय थाळनेर -२७५
७) आर सी पटेल ईंग्लिश मेडी-४८५
८) संत गाडगेबाबा विद्यालय थाळनेर -१६१
एकुण -४२०३







