क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात शिवजयंती साजरा
नंदुरबार – प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील कोंढावळ येथे संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संचलित, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .
या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. पी. माळी होते.प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. त्या नंतर इ. आठवीचा विद्यार्थी हितेश बागुल व इ. पाचवीची विद्यार्थी हर्षदा माळी या दोन विद्यार्थीनी आपल्या मनातील विचार व्यक्त करतांना शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारली. पूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. डी. वाल्हे यांनी केले.
उपशिक्षक प्रमोद परदेशीं यांनी आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांचे विचार विद्यार्थ्यांनपुढे मांडले. शिवाजी महाराजांनी उभारलेले स्वराज्य तलवारीच्या धारेवर नाही तर कौतुकाच्या थापेवर उभे केले. याचे अनेक दाखले देत शिवकाऱ्याचा इतिहास मांडला. कार्यक्रमाचा शेवट करतांना वाय. एस. शिंपी यांनी उपस्थित प्रमुख अतिथी तसेच अध्यक्ष यांचे आभार मानले व विदयार्थीचे कौतुक करून कार्यक्रमाची सांगता केली.







