पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या सांगली शहराध्यक्ष पदी श्री. नंदकुमार पांढरे
पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या सांगली शहराध्यक्ष पदी श्री नंदकुमार पांढरे यांची निवड पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. संतोष दादा चौधरी यांच्या आदेशानुसार व गजानन भगत राष्ट्रीय जनसंपर्क प्रमुख यांच्या सुचनेनुसार मा. सुनील भाऊ पाटील महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष यांच्या सहमतीने व मा. शहाजी कांबळे जनसंपर्क प्रमुख सांगली जिल्हा यांच्या वतीने नंदकुमार पांढरे यांची निवड करण्यात आली.
नंदकुमार पांढरे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेले काम संघटनेचे महत्त्व ओळखून पोलीस व नागरिक यांना मदत कराल व संघटनेची प्रतिमा उज्वल कराल असा संघटनेचा ठाम विश्वास आहे. पांढरे यांच्या निवडीचे सांगली शहर व भागातील अनेकांनी कौतुक करत अभिनंदन केले आहे.