• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, April 19, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

कापूस विकेना अन् पिसवा पिच्छा सोडेना भाववाढीच्या अपेक्षेने घरात साठवून ठेवलेल्या कापसाने शेतकऱ्यांची उडाली झोप

माणगंगा by माणगंगा
February 21, 2024
in महाराष्ट्र
0
कापूस विकेना अन् पिसवा पिच्छा सोडेना भाववाढीच्या अपेक्षेने घरात साठवून ठेवलेल्या कापसाने शेतकऱ्यांची उडाली झोप

कापूस विकेना अन् पिसवा पिच्छा सोडेना भाववाढीच्या अपेक्षेने घरात साठवून ठेवलेल्या कापसाने शेतकऱ्यांची उडाली झोप

त-हाडी :- कापसाला यावर्षी भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. कापसावर केलेल्या खचर्चापेक्षा उत्पन्न कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यंदा कापसाला चांगला भाव मिळेल या आशेवर बहुतांश शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिना संपत आला तरी कापूस विकला नाही.आता घरात साठवून ठेवलेल्या कापसामध्ये किडे तयार होत असून या पिसामुळे शेतकऱ्यांच्या घरातील सदस्यांच्या अंगाला खाज सुटण्याचे प्रमाणवाढले आहे.

ग्रामीण भागात या रुग्णच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.कापसाला जास्त भाव मिळत नसल्याने विकता देखील येत नाही तर दुसरीकडे त्याच्यातील पिसामुळे अंगाला सुटणाऱ्या खाज मुळे कापूस घरात ठेवायलाही आता शेतकरी तयार नसल्याचे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे.

कापसाला चांगला भाव येईल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेल्या कापसात पिसवा झाला आहे. त्यांच्या चाव्यांनी शेतकऱ्यांची रात्रीची झोप उडावली आहे. पिसवा चावल्याने संपूर्ण शरीरावर लाल फोड येत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. मागील वर्षी कापसाच्या भावाने दहा हजारांचा उंबरठा ओलांडून प्रति क्विंटल १४ हजार असा उच्चांकही गाठला होता.

यंदा शेतकऱ्यांचा कापूस बाजारपेठेत येण्यास सुरुवात होताच भावात मोठी घसरण झाली आहे. सद्यस्थितीत कापसाला प्रति क्विंटल  6500 ते 6700  पर्यंत भाव मिळत आहे. विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी एक किंटल पांढऱ्या सोन्याच्या उत्पादनासाठी किमान दहा हजार रुपये खर्च आला. तर सध्या कापसाला प्रति क्विंटल 6500 हजारांपर्यंतच भाव मिळत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार कसे, असा सवाल कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

सरकारने शेतकरी हितार्थ निर्णय घ्यावे, अशी मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे. भाववाढीच्या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरात ठेवला. मात्र भावात वाढ होण्याऐवजी भाव कमी होत असल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.

भाववाढीच्या प्रतीक्षेत अनेकांनी कापूस घरीच साठवून ठेवला आहे. असे असले तरी उसनवारीची परतफेड करण्यासाठी अनेक शेतकरी सध्या आपल्याकडील कापूस विक्री करीत आहे. एकूणच शिरपूर तालुक्यातील विविध भागांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भाव वाढीची प्रतीक्षा आहे.

Views: 211
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
भिवंडी कोळी आगरी महोत्सवाचे जयेंद्रदादा खुणे यांच्या शुभहस्ते उदघाटन

भिवंडी कोळी आगरी महोत्सवाचे जयेंद्रदादा खुणे यांच्या शुभहस्ते उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)