क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरा
कोंढावळ -प्रतिनीधी
शहादा तालुक्यातील कोंढावळ येथे संत सावता माळी बहुउद्देशीय विकास मंडळ संचलित, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विदयालयात संत गाडगेबाबा जयंती साजरा करण्यात आली त्यावेळी. कर्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक आर. एच. खैरनार होते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत. प्रतिमा पूजन दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
उपशिक्षिका एम. एम. माळी यांनी आपल्या मनोगतातून संत गाडगेबाबा यांचे कार्य सांगताना कीर्तन कसे असावे याविषयीं सांगताना गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून समजप्रबोधन करायचे स्वच्छतेचे महत्व लोकांना आपल्या कार्यातून पटवून देत तसेच अंधश्रद्धा यावर टीका करतांना तिर्थी धोंडा पाणी| देव रोकडा सज्जनी || अशा शब्दात लोकांना जागृत कारायचे असे अनेक दाखले देत गाडगेबाबा यांचे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी. डी. वाल्हे यांनी केले आभार प्रमोद परदेशी यांनी मानले
कार्यक्रमला उपस्थित मान्यवरांचे आभार मानले व कार्यक्रमा नंतर शालेय परिसरात स्वच्छता मोहिमे अंतर्गत स्वच्छता करून स्वच्छतेचे महत्व विद्यार्थ्यांना पटविण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी के. एस. सैंदाणे, एस. पी. सोनवणे मॅडम तसेच आर. डी. माळी स्वप्नील बैसाणे यांनी सहकार्य केले







