श्री.शहाजी कांबळे यांना राज्यस्तरीय “संत रविदास युवा समाज भुषण ” पुरस्कार जाहीर…
मराठी भाषा गौरव दिन ,महाराष्ट्र राज्य चर्मोद्योग विकास महामंडळ (लीडकॉम )सुवर्ण महोत्सव ,संत रविदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सकल चर्मकार समाज महाराष्ट्र राज्य ,सम्राट अशोक विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि संत रोहिदास महाराज सेवा संघ अहमद नगर यांच्या संयुक्त विधमाने युवा सामाजिक कार्यकर्ता मा.शहाजी कांबळे यांना ” संत रविदास युवा समाज भुषण पुरस्कार “जाहीर झाला आहे.
सदर राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दि.27/2/2024 रोजी अ.नगर येथे आमदार संग्राम जगताप मा.आमदार बाबुराव माने ,मा.सुर्यकांत गवळी मा.कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन ,मा.अशोक विजयकर माजी चेअरमन लीडकॉम,मा.अशोक कानडे नगरसेवक व संस्थापक अध्यक्ष भारतीय उठाव संघ यांचे हस्ते संपन्न होणार आहे.
श्री शहाजी कांबळे हे महावितरणचे दैनदिन कामकाजाबरोबरच गरीब गरजु लोंकांचा स्वखर्चाने बंद पडलेला विज पुरवठा सुरक्षित करून त्यांचे घर प्रकाशमय करणे. वादळी वारे पुरपरीस्थितीमध्ये अखंडपणे कोलमडलेली विज यंत्रणा जास्तीत जास्त वेळ देऊन सुस्थितीत ठेवली. विज क्षेत्रात गेली7वर्षे कार्यरत आहे.
आता सध्या पोलिस मित्र संघटना नवी दिल्ली भारत या संघटनेमध्ये पूर्वी शिराळा तालुका उपाध्यक्ष ते सांगली जिल्हा जनसंपर्क प्रमुख या पदावर कार्यरत आहे समाजातील प्रत्येक घटकाला सर्व धर्म समभाव जात भेद न करता न्याय देण्याचा काम केले आहे. करत आहे.
पत्रकार, गरिब शेतकरी कुटुंबातील मुले पोलीस भरतीमध्ये नियुक्त झालेल्या तसेच सर्व क्षेत्रामध्ये MPSC मार्फत निवड झालेल्या उमेदवारांचा सत्कार करण्याचे काम केले आहे. तसेच पोलिस प्रशासन यांच्या न्याय हक्कासाठी समाजामध्ये शांतता राखण्याचे काम पोलिस मित्र संघटनेच्या माध्यमातुन करत आहे.







