आटपाडी तालुका राष्ट्रवादीओबीसी सेलचे अध्यक्ष समाधान पाटील यांचा अपघात…
मजूर संस्थेच्या विरोधातील आंदोलन व झरेतील निष्कृष्ट कामाच्या विरोधातील लढाईला खिळ…
आटपाडी प्रतिनिधी
झरे ता. येथील आटपाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल (अजित पवार गट )आटपाडी तालुकाध्यक्ष समाधान किसन पाटील यांच्या वर दि.४ रोजी बिरणवाडी वायफळे नजिक येथे अपघात झाला. हा अपघात नसून प्राणघातक हल्ला आहे असे पाटील यांचे मत आहे.
यामध्ये पाटील यांच्या डोक्यास व हाता पायाला जबर मुका मार लागला आहे या अनुषंगाने तासगाव पोलिस ठाण्याअंतर्गत अज्ञात वाहन चालकावर भारतीय दंड विधान संहिता 1860 अधिनियमान्वये कलम 279,337,338 मोटार व वाहन अधिनियमान्वये 1988 कलम 184,134 (A),134 (B) 177 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की पाटील हे मुख्य कार्यकारी अधिकारी ,व जिल्हाधिकारी यांच्याकडे झरे येथील मायाक्कादेवी मंदीर या ठिकाणी लोकवर्गणीतून पेव्हिंग ब्लाॅक बसविलेले असताना,देखील ग्रामपंचायत प्रशासनाची फसवणूक करून रोजगार हमी योजनेअंतर्गत सदर कामाचे टेंडर काढत असल्याची तक्रार देण्यासाठी, तसेच जुन्या मजूर संस्था बंद व्हाव्यात, मजूर संस्था एका गावाची कारभार दुसऱ्या गावात अशी अवस्था आहे.किंवा नवीन मजुर संस्था नोंदणीला परवानगी द्यावी अश्या आशयाची दोन निवेदने देण्यासाठी गेले होते.
दुपारी 3 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली यांच्या दालनात सु.बे अभियंता यांची बैठक पार पडली या बैठकीदरम्यान समाधान पाटील यांना फोन कोणाचा तरी फोन आला व यामध्ये तु तक्रार देऊ नकोस असे म्हणाले म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
यानुसार समाधान पाटील यांनी असे मत व्यक्त केले की दुपारी झालेल्या वादातून मला मारण्याच्या उद्देशाने अज्ञात व्यक्ती गाडीने माझ्या गाडीस धडक देऊन मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे, माझ्या जिवितास धोका असुन मी तासगाव पोलिस ठाण्याअंतर्गत फिर्याद दिली आहे परंतु अद्याप दोषींना अटक करण्यात आली नाही
चौकट:
मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली यांच्या दालनात सुबे अभियंता यांची बैठक झाली या बैठकीदरम्यान मला धमकी चां दोन आला होता. पण मी सुदैवाने बचावलो परंतु माझ्या जिवितास धोका आहे परंतु पोलिसांनी कोणालाही अद्याप ताब्यात घेतले नाही.
………….समाधान किसन पाटील….तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल