सेना सरपंचानी संपूर्ण गावचे मतदान देण्याचा विशाल पाटील यांना दिला शब्द.. राजकीय वर्तुळात खळबळ
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यामध्ये काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांचा नुकताच गाव भेटीचा दौरा संपन्न झाला .या दौऱ्यामध्ये प्रत्येक गावामध्ये गाव बैठक घेण्यात आली व येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात चाचणी घेण्यात आली आहे.
पाटील यांचा दौरा सायंकाळी सात ते आठच्या दरम्याने एका गावामध्ये आला होता. या गावांमध्ये सर्वच पक्षाचे नेते कार्यकर्ते ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते .त्यामध्येच सर्वपक्षीय पाठिंब्याने निवडून आलेले शिवसेनेचे सरपंच उपस्थित होते. त्यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करीत असतानाच संपूर्ण गावच्या समोर भावनेच्या भरात आमचे संपूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे असा शब्द दिल्याने राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडाली आहे.
सरपंच कोणत्याही पक्षाचा असो गावांमध्ये येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करणे त्यांचे काम आहे .परंतु संपूर्ण गावचे मतदान देऊ हा शब्द अनेकांना खटकला असल्याने अनेक कार्यकर्ते नेते सरपंचावर नाराज झाल्याचे दिसून येत आहे.
सरपंचावर एका पक्षाचे शिक्कामोर्तब झाले आहे. मग आपण इतर पक्षाच्या नेत्यांना संपूर्ण गावची वकालती घेऊन शब्द कसा काय देता हा गंभीर प्रश्न असून याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे .
ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचांना राष्ट्रवादी ,काँग्रेस व भाजपातील नाराज गट यांनी सेनेच्या सरपंचाला निवडून दिले आहे .परंतु काँग्रेसचे नेते लोकसभेसाठी चाचपणी घेण्यासाठी गाव दौरा करीत असताना यामध्ये समस्त ग्रामस्थांच्या समोर आम्ही संपूर्ण गाव तुमच्या पाठीशी आहे. असे जबाबदार व्यक्ती सरपंच यांनी शब्द देणे हे कितपत योग्य आहे याबाबत संपूर्ण तालुक्यात खुमासदार चर्चा सुरू आहे.
तर तालुक्याचे काँग्रेसचे नेते संपूर्ण तालुक्यामध्ये सांगत आहेत की एका गावच्या सेनेच्या सरपंचाने नियोजन चांगले केले होते त्या गावातून चांगला प्रतिसाद मिळाला असे खुद्द काँग्रेस नेते च तालुक्यामधून सांगून राहिले आहेत.