पुन्हा माढ्याच्या जनतेच्या निंबाळकर माथी पण विजयाची दोरी जानकरांच्या हाथी….
विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधि
निरा देवधर चे जनक, अल्पावधित जलनायक म्हणुन उदयास आले सर्वसमावेशक व्यक्तीमत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा भाजपने माढ्याच्या रिंगणात उतरवले आहे. माढा मतदारसंघ हा सर्वात मोठा मतदार संघ असुन सहा विधानसभा मतदार संघाचा हा लोकसभा मतदार संघ आहे असे असले तरी माढ्याच्या विजयाची गणिते माळशिरस तालुक्यातुन ठरतात ज्या उमेदवाराच्या पाठीशी तालुका पोषक असतो तो उमेदवार विजयी ठरतो ही आजपर्यतचा इतिहास आहे . माळशिरस तालुक्यात उत्तमराव जानकरांची भुमिका काय आहे याकडे आता संपुर्ण माढ्याचे लक्ष लागुन आहे.
उत्तमराव जानकरांना भाजपने सोलापुर लोकसभेसाठी लढवले तर जानकर समर्थक माळशिरस मधुन भाजपसाठी सक्रीय पणे काम करु शकतात अन्यथा भाजपसाठी माढ्यातुन खुप मोठी धोक्याची घंटा आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि उत्तमराव जाणकर ही राम लक्ष्मणाची जोडी म्हणुन संपुर्ण राज्यात परिश्चयाची आहे असे असले तरी भाजपने गत विधानसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातुन उमेदवारी बाबत जानकरांना दिलेली हुलकावनी अजुनही माळशिरस मधील जानकर समर्थक विसरले नाहीत त्यामुळे आता नाही तर कधीच नाही अशी जानकर समर्थकांची भुमिका आहे
आता सोलापुर लोकसभा उमेदवारी बाबत जानकरांना भाजपने डावलले तर माढा आणि सोलापुर लोकसभेसाठी भाजपला खुप मोठा फटका बसु शकतो असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयाच्या चाव्या जानकरांच्या हाती आहेत असं म्हटलं तर वावगे ठरणार नाही.