आमचे मार्गदर्शन व्ही.एम. मोरे साहेब सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्याबद्दल मला आलेला अनुभव. – पत्रकार सदाशिव पुकळे
आमचे मित्र व मार्गदर्शक टेंभू योजनेचे उपविभागीय अभियंता व्ही .एम. मोरे साहेब आज सेवानिवृत्त होत आहेत.
मागील तीन वर्षांपूर्वी माझी आणि व्ही एम मोरे साहेब यांची ओळख झाली.
पडळकरवाडी ता. आटपाडी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी कालव्यामध्ये गेल्या आहेत. परंतु संपूर्ण गावचा नकाशा चुकल्याने गट नंबर, शेतकऱ्याचे नाव व ज्या हद्दीतून कालवा गेला आहे त्या यादीतील नाव याचा ताळमेळ लागत नव्हता.
याबाबत पडळकरवाडी चे माजी सरपंच विठ्ठल पडळकर यांनी कालव्याच्या संदर्भातली माहिती मला दिली त्यानंतर गट दुरुस्ती साठी मी दैनिक सकाळच्या माध्यमातून आवाज उठवला. त्यानंतर मोरे साहेबांची आणि माझी पहिली मुलाखत पडळकर वाडी येथील कालवा वर झाली. त्यानंतर आम्ही दोन तास याबाबत चर्चा केली त्यानंतर टप्प्याटप्प्याने गट दुरुस्तीचा मार्ग निकाली निघत गेला.
याबाबत माझ्याशी आलेला संबंध म्हणजे शांत बोलणे ,मनमिळावू स्वभाव, समोरून कितीही रागाने शेतकरी बोलला तरी त्यांना त्यांचं म्हणणं ऐकून त्यांना समजावून सांगणे त्यातून मार्ग काढणे आणि त्या शेतकऱ्याचं काम करणे अशा प्रेमळ स्वभावाचे मोरे साहेब हे सेवेतून निवृत्त होत आहेत.
असे अधिकारी टेंभू कार्यालयाला पुन्हा मिळणे अशक्य आहे .असं माझं वैयक्तिक मत आहे. मोरे साहेबांनी अनेक शेतकऱ्यांना टेंभू कालव्यात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले दिवस-रात्र त्यांनी काम केले
तसेच सामाजिक कार्याची ही त्यांना आवड आहे आम्ही अनेक वेळा वेगवेगळ्या विषयावर दोन दोन तीन तीन तास चर्चा करत बस त होतो. एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी एका शिक्षण संस्थेला पुस्तके भेट म्हणून दिली. त्यांना समोरच्या माणसाचा कळवळा मया येत असे. त्यामुळे समंजस पणाने प्रामाणिकपणे त्यांनी काम करून शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला आहे.
आधिकार्याचे मित्र बनले
पडळकर वाडी येथील कालवा गट दुरुस्ती साठी शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून दैनिक सकाळच्या माध्यमातून आवाज उठवला होता यासंदर्भात मोरे साहेब स्वतः टेंभू कालव्या वर आले व माझ्याशी गट दुरुस्तीसाठी दोन तास चर्चा झाली. गट दुरुस्ती साठी काय केले पाहिजे कोणत्या मार्गाने गेले पाहिजे तर आपल्याला न्याय मिळेल व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळेल अशी चर्चा झाल्यानंतर त्या मार्गाने आम्ही गेलो व शेतकऱ्यांना न्याय मिळाला. काही दिवसातच त्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळेल.
तसेच पारेकरवाडी येथील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळवून दिला, तर घरनिकी येथील पंधरा सोळा वर्षांपूर्वी ची फाईल विटा कृषी विभागाकडे पडून होती याबाबत टेंभू योजनेचे शेख साहेब यांनी मला कल्पना दिल्यानंतर याबाबत काय करावे लागेल यासाठी मी मोरे साहेबांशी चर्चा केली व त्यानंतर दैनिक सकाळ मधून याबाबत आवाज उठवला ज्या व्यक्तीला आठ लाख रुपये मंजूर झाले होते त्या शेतकऱ्याला 40 लाख रुपये मिळवून देण्यासाठी मला मोरे साहेब व शेख साहेबांनी मार्गदर्शन केले.
या शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भातून त्यांची व माझी मैत्री झाली .त्यांचा मनमिळावू स्वभाव कोणाचे मन दुखवू नये, समोरच्या व्यक्तीला अंतकरणापासून कामाची माहिती आवडीने सांगत. समोरच्या व्यक्तीचं काम व्हावं यासाठी असणारी तळमळ ही त्यांच्यामध्ये होती.
रात्री-अपरात्री कधीही त्यांना फोन करून काही माहिती विचारली असता अगदी स्पष्टपणे ते माहिती सांगत होते. किंवा फोन उचलला नाही तर ते पुन्हा ज्या वेळेला वेळ भेटेल त्यावेळेस फोन करून तुमची काय अडचण आहे असे विचारत होते.
असे अधिकारी आणखी काही दिवस सेवेत असावेत परंतु शासनाच्या नियमाप्रमाणे वयाच्या नियमाप्रमाणे त्यांना सेवानिवृत्त व्हावे लागणार आहे.
त्यांच्या सर्विस मध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांची कामे केली अशा मोरे साहेबांना शेतकऱ्यांच्या जनतेच्या वतीने व माझ्या वतीने खूप खूप खूप शुभेच्छा.
आपलाच
श्री.सदाशिव पुकळे
पत्रकार – दैनिक सकाळ