मनुवादाची कास धरणाऱ्या आंबेडकरी दलालांना चारही मुंड्या चित करा.:- पॅन्थर डॉ. राजन माकणीकर
मुंबई दि (प्रतिनिधी) मनुवादी विचारांची कास धरून आंबेडकर विचार संपविण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या, संविधानाची पायमल्ली करण्यास मदत करणाऱ्या आंबेडकरी दलालांना त्यांची औकात दाखवून देण्याचे आवाहन देशव्यावी संविधान जनजागृती व साक्षरता अभियान चे राष्ट्रीय आयोजक विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी केले आहे.
मनुवादाचे पुनः रुज्जीकरण करून आंबेडकर विचाराला डावलण्याचे काम करणाऱ्या आंबेडकरी समाजातील मनुवादी नाजायज पिलावळींना थारा न देता राजगृहाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचे आवाहन समाजभूषण डॉ. माकणीकर यांनी केले आहे.
मनुवादी औलादीचे किडे हरेक समाजात घुसून वैचारिक समानता पोखरून काढत आहे. अनैतिक संतानांचे जाळे पसरवत आहे. प्रलोभने तर धार्मिक व सांस्कृतिक आस्था निर्माण करून धम्मात भेसळ करून राजकीय सत्तेची पोळी भाजून पुन्हा गुलामी आणि दारिद्र्याच्या चव्हाट्यावर आंबेडकरी समूहाला आणण्याचे काम या वृत्ती आणि प्रवृत्ती करु पाहत आहेत.
यामुळे विषमतेची बांडगुळ समतेचे निशाण व जातीची बेईमान लोक घेऊन तुमच्या दारात वस्तीत येतील अश्याना थारा देऊ नका. संविधान वाचवायचे आहे, आंबेडकर विचार मजबूत करायचा आहे, समाज घडवायचा आहे यामुळे मनुवादी विचाराच्या पक्षाला माणसाला किंवा त्याच्या मित्रपक्षाला जवळ ही उभा न करण्याचे जाहीर आवाहन पॅन्थर डॉ. माकणीकर यांनी प्रसारमाध्यमातून केले आहे.



