आटपाडीतील प्रशासकीय इमारतीतील स्वच्छतागृह दुरुस्तीसाठी निधी मंजूर …संतोष हेगडे
दुर्गंधीच्या विळख्यातून सुटणार नागरिक व अधिकारी
आटपाडी प्रतिनिधी
आटपाडी ता. आटपाडी येथे भव्य अशी सुंदर प्रशासकीय इमारत बांधलेले आहे. या इमारतीमध्ये जास्तीत जास्त शासकीय कार्यालय आहेत .त्यामुळे येथे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची सतत वर्दळ असते. परंतु या प्रशासकीय इमारतीतील स्वच्छतागृह असून तोटा आणि नसून खोळंबा अशा अवस्था आहे.
या स्वच्छतागृहामध्ये किंवा स्वच्छतागृहाच्या आसपास असणाऱ्या नागरिकांना,अधिकाऱ्यांना या स्वच्छतागृहाची दुर्गंधी सुटून अतोनात नाहक त्रास होत होता. अनेक जण तेथून जात असताना नाकाला रुमाल लावून जात होते नागरिक ही व अधिकारीही परंतु परंतु याकडे कोणी लक्ष देत नव्हते.
याची दखल घेऊन बसप चे संतोष हेगडे यांनी सतत पाठपुरावा केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदने दिली. व जिल्हा नियोजन कडून स्वच्छतागृहाच्या दुरुस्तीसाठी पाच लाखाचा निधी मंजूर केला. असल्याची माहिती बसपाचे संतोष हेगडे यांनी दिले आहे.
निधी मंजूर झाल्याने नागरिकांनी बसपचे संतोष हेगडे यांचे अभिनंदन केले. कारण जोपर्यंत निधी मंजूर होत नाही तोपर्यंत संतोष हेगडे यांनी आपला प्रयत्न सुरूच ठेवला होता. आणि अखेर निधी मंजूर केला .तालुक्यातून नागरिक प्रशासकीय इमारतीमध्ये विविध कामासाठी येत असतात व याच्या दुर्गंधीचा त्रास अनेक जणाला होत होता.
परंतु हेगडे यांनी प्रयत्न करून निधी मंजूर केला व स्वच्छतागृह दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होईल अशी माहिती बसपाचे संतोष हेगडे यांनी दिली.