• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Saturday, April 18, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

झटपट कर्जाच्या विळख्यात सापडली तरुणाई;एका क्लिकवर पैशाची उचल;३६ टक्क्यांपर्यंत व्याजाचा ससेमिरा

माणगंगा by माणगंगा
March 18, 2024
in महाराष्ट्र
0

झटपट कर्जाच्या विळख्यात सापडली तरुणाई;

एका क्लिकवर पैशाची उचल;

३६ टक्क्यांपर्यंत व्याजाचा ससेमिरा

त-हाडी : कर्जासाठी बँकेत ओळख, दोन जामीनदार, सामाजिक प्रतिष्ठा या गोष्टी मागे पडून मोबाइलच्या एका क्लिकवर झटपट कर्जाचा फंडा सुरू झाला आहे. यामुळे त-हाडीसह परिसरातील, ग्रामीण भागातील तरुणांना कर्जाऊ रकमा उचलण्याची चटक लागली आहे. १६ ते ३६ टक्के व्याजाचा ससेमिरा घेऊन वसुली कर्मचारी दारात धडकतात, तेव्हाच आपल्या पोराने एवढे कर्ज घेतले आणि त्याची व्याजासह रक्कम एवढी असल्याचे ऐकून कुटुंबीयांना धक्का बसत आहे.

एक हजार रुपयांचे कर्ज घ्या ते फेडा. पुढील कर्ज पाच हजार घ्या ते फेडा अशी रक्कम वाढत जाऊन तीस हजारांपर्यंतचे पर्सनल लोन सहजपणे मिळवा, अशा आशयाच्या जाहिराती पाहून या चक्रात तरुणाई गुरफटत चालल्याचे दिसून येते. शहरातील अनेक गरीब व मध्यम वस्तीत याचे पेव फुटल्याचे दिसून येत आहे. वसुली करणारे दारात उभे राहिल्यानंतर अनेक कुटुंबीयांच्या तोंडचे पाणी पळते. त्यातून वादावादीचे प्रकार घडत आहेत.

त्वरित कर्ज देताना अवघ्या पाच मिनिटांत जलद आणि पेपरलेस कर्जाची रक्कम ग्राहकाला दिली जात आहे. ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने व्यवहार करून कर्ज पुरवले जात आहे. १२ महिन्यांच्या कालावधीसाठी ३० ते ३६ टक्के व्याजाने आपण हे कर्ज घेत असल्याची समोरच्याला पुसटशी कल्पनाही नसते. पालकांच्या अपरोक्ष युवावर्ग, काही महिला परस्पर असे कर्ज उचलत आहेत.

त्यांच्या या व्यवहाराची कोणतीच कल्पना घरच्यांना नसते. अशावेळी वसुलीसाठी येणाऱ्यांसमोर कुटुंबीयांना तोंड द्यावे लागत आहे. या पैशांचा मुलाने कशासाठी वापर केला, हे विचारण्याऐवजी पालक प्रतिष्ठेपोटी कर्ज स्वतःच परतफेड करताना दिसतात. त्यातून आर्थिक नुकसान होत आहे.

परतफेडीची खात्री काय?

केवळ दोन कागदपत्रांच्या आधारे कंपन्यांचे कर्मचारी कर्ज वाटप करीत आहेत. यातून चैनीसाठी असे कर्ज उचलणाऱ्यांची संख्या त-हाडीसह परिसरात वाढत आहे. कर्जाची परतफेड करण्याचे उत्पन्नाचे मार्ग नसलेल्यांना अशी खिरापत वाटून या कंपन्यांनी मात्र आपले उद्दिष्ठ साध्य केल्याचे चित्र आहे.

युवकांनी झटपट लोण देणारे किती टक्के व्याज दरात कर्ज देताहेत, त्या दराचा करार करून घ्यावा. कर्जवसुलीसाठी अगोदर कर्जदाराला नोटीस देणे, न्यायालयातून वसुली दाखला मिळविणे गरजेचे असते. त्याशिवाय वसुली करता येत नाही. युवकांनी या नियमांची माहिती करून घ्यावी. झटपट कर्ज मिळविण्यात आपली फसवणूक होत नाही ना याची खात्री करून घ्यावी.

भुषण बागुल,
कर सल्लागार, शिरपूर

Views: 207
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
एम्.के.एज् प्रस्तुत’म्युझिक मंत्राच्या’संचालिका शर्मिला केसरकर”राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

एम्.के.एज् प्रस्तुत'म्युझिक मंत्राच्या'संचालिका शर्मिला केसरकर"राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान
  • माझंही मत;उद्धव ठाकरेंनी आता पुन्हा विधान परिषदेत जाण्याचा हट्ट धरू नये..;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • श्री प्रवीण काकडे यांना महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)