विभूतवाडीतील स्वच्छताग्रहाची दुरावस्था, दुर्गंधीमुळे नागरिकांना होतोय नाहक त्रास..
विभूतवाडी ता. आटपाडी येथे कराड पंढरपूर रस्त्यालगत, अंगणवाडीच्या पूर्वेस शालेय स्वच्छतागृह आहे . या स्वच्छतागृहाचा वापर सर्वच नागरिक करतात. परंतु या स्वच्छतागृहाची पडझड झाली आहे व स्वच्छता ग्रहांमध्ये पाण्याचा वापर होत नसल्याने त्याची दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे नागरिकांना याचा नाहक त्रास होत आहे.
सायंकाळच्या वेळेस दुर्गंधी जवळपास गणेश वाघमारे यांच्या दुकानापर्यंत येत आहे. तरी ग्रामपंचायतीने स्वच्छतागृहाची स्वच्छता करावी व नागरिकांना होणारा त्रास थांबवावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.







