• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, April 19, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यात बहुगुणी पळस फुलांनी परिसर सजला

माणगंगा by माणगंगा
March 22, 2024
in महाराष्ट्र
0
शिरपूर तालुक्यात बहुगुणी पळस फुलांनी परिसर सजला

शिरपूर तालुक्यात बहुगुणी पळस फुलांनी परिसर सजला

त-हाडी

शिरपूर तालुक्यात व त-हाडी परिसरात बहुगुणी पळस फुलांनी परिसर सजला आहे.वसंत ऋतुमध्ये हिंदू धर्मियांच्या महत्याचा सण म्हणजे होळी देशभर साजरा केला जातो. धुलीवंदनाला एकमेकांना रंग लावून स्नेह द्विगुणित करून आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. वसंत ऋतूमध्ये शिरपूर तालुक्यातील त-हाडी परिसरात वरूळ ते अंकलेश्वर या राज्य मार्गावर पळस फुलांनी बहरलेले अनेक झाडे दिसून येत आहे.
पळस या झाडाला आयुर्वेदामध्ये अनन्य साधारण महत्व आहे.

पळसाची झाडे ही वेडी वाकडी आणि फारसी उंच नसतात त्यातच या झाडाची साल ही खरबडीत आणि राखांडी रंगाची असली तरीही पळसाची फुले मात्र माणसाचे मन मोहित करून घेतात. कोणाचीही नजर पळसाच्या रंगीबेरंगी फुलावर पडताच प्रत्येकाला आपलेसे वाटते. पळसाची रंगी बेरंगी फुले अंघोळीच्या पाण्यात टाकून अंघोळ केल्यास त्वचारोग नाहीसा होतो.


तसेच पळस झाडाच्या बियाचाही औषधी म्हणून उपयोग केला जातो. एकीकडे वृक्ष वल्ली आम्हा सोयरे या संत तुकाराम महाराजांच्या ओळी आहेत परंतु मानवाने वृक्ष वनसंपदा नष्ट करण्याचा सपाटा लावला असला तरीही नष्ट होत असलेल्या वृक्षसंपदेत औषधी पळस फुलांचे सौंदर्य अधिक भर टाकतांना दिसून येत आहे.

शिशिर ऋतुमधे वातावरणातील गारवा लुप्त होऊन पानगळीने उघडी पडलेली वनसंपदा पळस फुलांच्या सौंदयांन रंग उधळतांना आपल्याला दिसते. तसेच आपले लक्ष वेधत असते. कुठेही गेले तरी ‘पळसाला पाने तीनच अशी म्हण आहे. तोच पळस चहुगुणी असून त्याच्या फुलांचा उपयोग होळीत रंग बनविण्यासाठी होती. पानांचा उपयोग ढोण, पत्रावळी, बिडी निर्मितीसाठी केला जातो.

पळस हा खडकाळ, हलकी व मध्यम निचरा होणाऱ्या जमिनीत विशेषतः उगवतो. शेताच्या धुऱ्यावर आढळणारा पळस पानगळ वृक्ष असून झाडांची पाने गळून गेली की, मग पळसाच्या फुलांचे घड
येतात. सच्या निसर्गात केशरी, भगवा, पंधरा आणि पिवळा अशा विविध रंगाची फुले आढळून येतात. बहुगुणी असलेला हा पळस काही भाग वगळता वगळता मानवाच्या अवैध वृक्षतोडीमुळे दुर्मिळ होताना दिसत असला तरीही आहे. जाळीचा देव ते अजिंठा या राज्य मार्गावरील पडीक जमिनीवरील माळरानावर तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर पळस चांगलाच चहरलेला दिसून येत आहे

.पळस झाडाच्या फुलांना शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. या फुलांची पाने ही अनेक त्वचा रोगांवर प्रभावी ठरतात तसेच या झाडाची साल ही जखम भरण्यासाठी वापरली जाते. अशा अनेक उपयोगी पडणारा हा पळस वृक्ष आहे. पळसफुलांची गुच्छ पाण्यात टाकली की, पळसफुले पाण्यात भिजू घालून ठेसून त्यापासून भगवा नैसर्गिक रंग तयार होतो. पूर्वी रंगपंचमीच्या दिवशी पळस फुलांचा रंग वापरला जायचा. याच रंगाने रंगपचंमी उत्सव साजरा होत असे. परंतु आज प्रत्येकाला वेळ नाही म्हणून बाजारपेठेत उपलब्ध असलेले कृत्रिम रंग विकत घेऊन त-हाडी परिसरात रंगपंचमी साजरी केली जाते.

Views: 153
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
वरूळ परिसरात बाजरी व ज्वारी बहरली !

वरूळ परिसरात बाजरी व ज्वारी बहरली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)