माढ्याचे रणांगण जिंकण्यासाठी भाजपची उत्तम कामगिरी?
विश्वजीत गोरड/पिलीव प्रतिनिधि –
माढ्यातुन भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दुसर्यांदा उमेदवारी दिल्याने माढ्यात राजकीय हलचालींना वेग आला. खासदारकीचे गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या धैर्यशील मोहीते पाटील यांनी आता माघार नाही हा नारा दिला. पक्षश्रेष्ठीवर दबावतंत्र म्हणुन संपुर्ण मोहीते पाटील माळशिरस तालुका पिंजुन काढु लागले परंतु दबावाला बळी पडणे हे फडणवीस यांच्या रक्तात नाही शांत राहुन मोहीते पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम केला. भाजपने आता मोहीते पाटील यांना वगळुन बेरजेचे राजकारण सुरु केले.
मोहीते पाटील यांचे कट्टर विरोधक उत्तमराव जाणकर यांना सागर बंगल्यावर बोलावले आणि समजुत काढली जानकरांना काही ठोस अश्वासनेही दिली परंतु यापुर्वी माळशिरस विधानसभेला आणि आता सोलापुरात लोकसभेला भाजपने दिलेला धक्का यातुन जाणकर अजुनही सावरले नाहीत. त्यामुळे आता भाजपवर विश्वास ठेवायला जाणकर तयार नाही असे असले तरीही जर जानकरांनी भाजपाच्या विरुद्ध धैर्यशील मोहीते पाटील यांचे काम केले तर मोहीते पाटील भविष्यवात जानकरांना विधानसभेला साथ देतील याचीही हमी नाही त्यामुळे जानकरांची हिकडे आड तिकडे विहीर अशी दुविधा अवस्था झाली आहे
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मात्र आता जाणकरांची मनधरणी करण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचे समजते जाणकर विरोधात जाणे हे भाजपला परवडणारे होणारे नाही. त्यामुळे जानकरांना लाभाचे पद देऊन काही मिटवामिटवी होतेय का यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फडणवीस यांच्या कडे आता साकडे घातले आहे.
एकंदरित माढा जिंकण्यासाठी भाजपला आता उत्तमराव जाणकर हे गळाला लावणे हाच रामबाण उपाय आहे असं म्हटल तरी वावगे ठरणार नाही. याबाबत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पत्रकार विश्वजीत गोरड यांनी कन्हेर येथील कार्यक्रमात जाणकराविषयी प्रश्न विचारला असता ते म्हटले की उत्तमराव जाणकर साहेब जरी नाराज असले तरी त्यांची नाराजी दूर करण्यासाठी आम्ही सर्वोपरी प्रयत्न करत आहे. लवकरच जाणकर माढ्याच्या प्रचारासाठी जोमाने काम करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो