तब्बल पाच दिवसांनी अधिकारी पोचले बांधावर
त-हाडी परिसरात नुकसान पंचनामा सुरू
त-हाडी -शिरपुर तालुक्यातील पूर्व भागात शुक्रवारी दुपारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने शेतातील पिकांचे क्षणार्धात होत्याचे नव्हते केले. यात अनेक शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. त्याबरोबर काही घरांचे तसेच विद्युत ताराही तुटल्या आहेत.त्यात कृषी विभागाने शेतांचा केलेल्या प्राथमिक पाहणीत ५१ शेतकऱ्यांचे सुमारे ७७ हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे.
शिरपूर तालुक्यातील पूर्व भागातील त-हाडी अभानपुर ममाणे ,जळोद ,त-हाडकसबे आदी गावांत शुक्रवारी (ता.१२)दुपारी चार वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या जोरदार वादळ वाऱ्यासह पाऊस झाला त्यामुळे कापणीला आलेले केळीचे झाडे जमिनीवर उन्हाळून पडली. त्याचबरोबर टरबूज खरबूज गहू,मका, ज्वारी, बाजरी कांदा आदींसह विविध पिकांचे नुकसान झाले आहे. आधीच अल्प पावसामुळे खरीप हंगामात अल्प उत्पादन आल्याने उत्पादित खर्चही निघाला नाही शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने रब्बीची पेरणी केली रब्बीवर मदार असताना अचानक आलेल्या अवकाळीने पिकांची अवकळा झाली. लाखो रुपये खर्च करूनही रुपयाचेही उत्पादन हातात आले नसल्याने शेतकरी होता हातात झाला आहे. या अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह पावसामुळे काही घरांचे छत उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे.
तात्काळ मदत मिळणे अपेक्षित…
निसर्गाच्या या लहरीपणाच्या फटका शेतकऱ्यांना बसत असताना सध्या लोकसभा निवडणूक असल्याने राजकीय नेते प्रचारात दंग असल्याचे चित्र आहे. या अस्मानी संकटात शेतकऱ्यांना पाहणी करुन धीर देण्या ऐवजी तात्काळ मदत कशी होईल याबाबत जास्त सजग असणे गरजेचे आहे. कारण गेलेले पीक आणि झालेले नुकसान भरून काढण्यासाठी या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्याला कसे बाहेर काढता येईल ही बाब सर्वाधिक महत्त्वाची आहे.
सर्वाधिक नुकसान केळीचे….
या पावसामुळे परिसरात सर्वाधिक नुकसान केळी पिकाचे झाले असून जवळपास १७ हेक्टरवर नुकसान झाल्याच्या प्राथमिक अंदाज आहे.त्यापाठोपाठ पपई ,टरबूज पाच हेक्टर, ज्वारी दोन हेक्टर, मका सहा व बाजरीचे तीन हेक्टर व नुकसान झाल्याच्या अंदाज आहे.
.
” शुक्रवारी सायंकाळी ठीक साडेपाच वाजता आलेल्या वादळी वाऱ्यासह सह आलेल्या पावसाने माझे सात एकर क्षेत्रातील संपूर्ण केळी उद्ध्वस्त झाली आहे. केळी लावायला ११महिने झाले होते.१५-२०दिवसांत कापणी होणार होती.परंतु निसर्गाने हिरावून घेतले.आता काय करावे सुचत नाही.गेल्या वर्षी ही पंचनामे केले परंतु काहीही भेटले नाही.या वर्षी काय भेटेल असा प्रश्न आहे.केळी पिकाला सहा लाख रुपयांपर्यंतच्या खर्च लागलेला आहे आणि हातात एक रुपया ही येणार नाही.शासनाने नुकसान भरपाई द्यावी.–
धनराज पाटील शेतकरी, त-हाडी
कृषी विभागाने प्राथमिक पाहणी करून अहवाल सादर केला आहे. लवकरच कृषी सहाय्यक व तलाठी नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे करतील.—महेंद्र माळी (तहसीलदार, शिरपूर)
गांव ,क्षेत्र (हे.), शेतकरी संख्या
त-हाडी – १६- ११
भटाणे – २५ -१६
अभानपुर.-८-१२
त-हाडकसबे- १३-१८
वरूळ.–१२-७
जळोद– ३-५
एकूण : ७७ हेक्टर, शेतकरी: ५१