तऱ्हाडी सह परिसरातील वादळामुळे इलेक्ट्रिक पोल महिना झाला तरी पडुनच……
शिरपूर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटुन कार्यवाही नाही
तऱ्हाडी :-तऱ्हाडीसह परीसरात ममाणे .तऱ्हाडी व अभाणपुर येथील शिवारात बारा एप्रिला चक्रीवादळाचा तडाखा बसला होता त्यात तीनही शेत शिवारातील दहा ते पंधरा इलेक्ट्रिक पोल चक्रीवादळ मुळे भुईसपाट झाले त्यामुळे ममाणे व तऱ्हाडी व अभाणपुर शेत शिवारातील पोल पडल्याने एक महिन्यापासून लाईट बंद आहे .
पोल मिळालेत म्हणून शिरपूर महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी भेट घेतली त्यानंतर एक महिन्यापासून वारंवार अधिकाऱ्यांनशी संपर्क करून ही इलेक्ट्रिक पोल मिळत नाही आत खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. तरी कापुस लागवड साठी लाईट ची गरज आहे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीस महावितरण कंपनीच्या अधिकारी जबाबदार राहतील असे तऱ्हाडी ममाणे व अभाणपूर येथील शेतकरी भाऊसाहेब जाधव. मंकुदा पाकळे.देवीदास पाटील.जगदीश परदेशी सुनिल परदेशी यांनी मागणी केली आहे
तऱ्हाडी येथील महावितरण कंपनीचा कर्मचारी एक महिन्यापासून रजेवर एक च कर्मचाऱ्यांवर कार्यभार असल्याने येण्याऱ्या अडचणी लवकर सुटत नाही म्हणून दुसरा कर्मचारी नेमण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे