तऱ्हाडी विद्यालयात सेवानिवृत्त प्राचार्य काल कथित के के.बैसाने यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्य वाटप
तऱ्हाडी:-
सेवानिवृत प्राचार्य के.के.बैसाने यांच्या स्मरणार्थ. युनियन बँक शाखा अधिकारी व साहित्यिक व मराठी अभिनेता डॉ तुषार बैसाने यांनी स्व.आण्णासो.साहेबराव सोमा पाटील माध्यमिक विद्यालय तऱ्हाडी येथे अभानपूर येथील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शैक्षणिक साहित्य साठ स्कूल बॅग व राजसागर गॅस एजन्सी चे मालक योगेश पाटील व कल्याण पाटील यांच्या कडून दोनशे नोटबुक वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुभाष भामरे प्रमुख पाहुणे म्हणून अरूण काळे . सुनिल पुराणिक.शरद सावळे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रमोद करंके संचालिका उज्वला भामरे संचालक प्रशांत भामरे शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष तुळशीराम भामरे मल्हार सेना जिल्हा उपाध्यक्ष सुनील धनगर विलास भामरे जेष्ठ शिक्षक भरत मराठे मुख्याध्यापक रावसाहेब चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला साहित्यिक व मराठी अभिनेता डॉ तुषार बैसाने यांनी आपल्या मनोगतात आजच्या काळात शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही म्हणून आपण शिकलो पाहिजे व शिक्षणाणे स्वताची आपल्या परीवाराची व सामाजाची प्रगती होते म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर एस चव्हाण यांनी केले व सुत्रसंचलन अनिल पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवीदास मोरे.भावेश पाटील. प्रवीण शिंदे संतोष आडगाये . शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी केले