जामनेर तालुक्यातील सामान्य जनतेचे आशास्थान समाजसेविका डॉकटर ऐश्वरी राठोड यांचा परिचय !!
जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
जामनेर: आपल्या सामाजिक सेवेमध्ये सक्रिय असलेल्या, स्वतःच्या व्यक्तिगत फाउंडेशन मार्फत स्वतःच्या स्वखर्चाने AYR Multipurpose Foundation नेहमीच आरोग्य सेवा असुद्यात, रक्तदान शिबिर असू द्यात, वस्त्रदान, अन्नदान पाठ्यपुस्तक वाटप शैक्षणिक अभियान तंबाखू मुक्त अभियान ,कॅन्सर मुक्त अभियान अशा विविध प्रक्रिया जामनेर तालुक्यामध्ये सुरुवात केली .
त्याच दृष्टिकोनातून हळूहळू राजकारणामध्ये संधी मिळाली. राजकारणामध्ये काँग्रेस पक्षाशी नेहमीच एकनिष्ठ असणाऱ्या कधीही विरोधकांसोबत हात न मिळवणाऱ्या कुठल्याही भ्रष्टाचारामध्ये हात न मिळवणाऱ्या, स्वतः पक्षासाठी नेहमी सक्रिय आणि एकनिष्ठतेने वरिष्ठांची आदेश अनुसार सक्रियरित्या काम करणाऱ्या .मग ती काँग्रेस पक्षाची डिजिटल मेंबरशिप असो .त्यामध्ये महाराष्ट्र मधून प्रथम क्रमांक मिळवलेल्या. डॉ.ऐश्वर्री राठोड दीडशे खेडे फिरून काँग्रेस पक्षासाठी एकनिष्ठ अशा सक्रिय महिला कार्यकर्त्या आणि पुरुषवर्गांना जोडून ठेवणाऱ्या. आपल्या आरोग्य सेवेतून 17 वर्षापासून सक्रिय असे आरोग्य सुविधा देणाऱ्या. सर्वच खेड्यांमधून संपर्कात असलेले पेशंट्स .विविध आंदोलन असू द्या किंवा पक्षासाठी खंबीर भूमिका असू द्यात अशा अनेक भूमिका निभवणाऱ्या संसार सांभाळून आरोग्य सेवा सांभाळून राजकारणासाठी काँग्रेस पक्षासाठी एकनिष्ठ आणि कर्तुत्ववान अशा महिला डॉ. ऐश्वरी राठोड यांची जामनेर तालुक्यामध्ये निश्चितच छवी आहे.
नेहमीच महिलांच्या संघर्षासाठी असू द्यात, मग त्या बलात्काराच्या केसेस असू द्यात, संसारीक ताण-तणाव महिलांमध्ये असू द्यात विविध महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये नेहमी सक्रियरित्या सहभाग घेऊन, त्यांचा प्रश्न सोडवण्याचं काम डॉ ऐश्वरी राठोड यांनी जामनेर तालुक्यामध्ये केले .दारूबंदीसाठी आवाज उठवणाऱ्या महिलांना उत्कृष्ट असं रोजगारांमध्ये कशाप्रकारे संधी उपलब्ध होईल अशा मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. ऐश्वरी राठोड यांचे सक्षम नेतृत्व जामनेर तालुक्यामध्ये दिसून येत. कोणाचाही आधार न घेता स्वतःचा कर्तुत्व नेहमी बजावत असतात.