दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दि मॉडेल इंग्लिश स्कुल सैतवडे येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन गटात स्पर्धा पार पडल्या .
लहान गटात (इयत्ता ५ वी ते ७ वी ) मध्ये प्रथम क्रमांक-आस्था शेटये , द्वितीय क्रमांक-स्वरांगी सुर्वे, तृतीय क्रमांक-प्रशिक सावंत व उत्तेजनार्थ क्रमांक अनय शेटये व चैतन्य शेटये यांनी पटकावला. मोठ्या गटात (इयत्ता ८वी ते १० वी ) मध्ये प्रथम क्रमांक-तन्वी बळकटे,द्वितीय क्रमांक-शुभम जाधव,तृतीय क्रमांक-धनश्री बळकटे हिने पटकाविला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन केले.या स्पर्धेचे संपुर्ण आयोजन व नियोजन इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निरजा धातकर,आभार श्वेतम लोकरे या विद्यार्थ्याने मानले तर सुत्रसंचालन धनश्री बळकटे हिने केले.
यावेळी श्री विनोद पेढे सर यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. तर परीक्षक म्हणून श्रीमती ऋतुजा जाधव व श्री राजेश पोवार यांनी काम पाहिले.यावेळी श्री रुमान पारेख सर,श्रीमती सुवर्णा देशमुख,निवेंडकर मँडम, श्री सावंत सर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन केलेल्या इयत्ता ९ वी च्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री विलासराव कोळेकर यांनी खास अभिनंदन केले.