डॉ. अश्विनी पाटील यांचे महाराष्ट्र सेट परीक्षेत घवघवीत यश
डॉ. आश्विनी पाटील या पुणे विद्यापीठाने आयोजित केलेल्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी महाराष्ट्र सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सेट परीक्षेसाठी डॉ .पाटील यांचा लाइफ सायन्सेस हा विषय होता. डॉ .पाटील या आर सी पटेल कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शिरपूर येथे प्राध्यपक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्टतेचे प्रमाण म्हणजे त्यांनी आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त जर्नल्समध्ये 20 संशोधनपत्रे प्रकाशित केली आहेत. भारत सरकारच्या दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने त्यांच्या संशोधनासाठी पंधरा लाख रूपयांचा निधी मंजूर केला आहे त्यांचे संशोधण सध्या सुरु आहे आणि त्यांचे संशोधन हे गर्भाशयाचा कर्करोग वर वरदान ठरणार आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. अमरीश भाई पटेल, मा. भुपेशभाई पटेल, उप अध्यक्ष मा. राजगोपालजी भंडारी, प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील, डॉ ए. एम. पाटील , डॉ एस. बी. बारी, विभागप्रमुख डॉ आर. एच. पाटील, डॉ संदीप पी. पाटील यांनी डॉ,अश्विनी यांचे कौतुक केले. डॉ अश्विनी या शिरपूर येथील एच आर पटेल फार्मसी चे प्राध्यपक डॉ. प्रविण ओंकार पाटील यांच्या धर्मपत्नी आहेत तर तऱ्हाडी येथील प्रगतिशील शेतकरी व माजी उपसरपंच श्री ओंकार दशरथ पाटील यांच्या सून आहेत आणि धुळे येथील वनविभागातील सेवानिवृत्त लिपिक घनश्याम गणपत पाटील यांची मुलगी आहे.