आश्रमशाळा जळोद येथे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा
त-हाडी
आज दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी आमच्या अनुदानित प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा जळोद ता शिरपूर जि धुळे येथे जागतिक आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रथमतः सकाळी गावात रॅली काढण्यात आली.
आश्रमशाळेत यावेळी कार्यक्रमाला जयश्रीताई अनिल पाटील (मा.नगराध्यक्षा व मा.जि. प सदस्य अंमळनेर) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली तसेच संस्थेचे अध्यक्ष अशोक आधार पाटील, कार्याध्यक्ष योगिता अशोक पाटील देखील कार्यक्रमाला उपस्थित होते
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर आणि पालक यांच्या हस्ते सर्व आदिवासी जननायकांच्या प्रतिमांचे पुष्पगुच्छ व फुलहार अर्पण करून पूजन करण्यात आले. या दिवसाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध आदिवासी जीवन पर नृत्य, गीते व नाटिका यांचे सादरीकरण केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी जननायक वीर बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले. आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला यामध्ये विद्यार्थी ,पालक ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घेतला.
मान्यवर व अध्यक्ष यांचा हस्ते शालेय पटांगणात वृक्षारोपण देखील करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाबद्दल प्रमुख पाहुणे जयश्रीताई अनिल पाटील व संस्था अध्यक्ष अशोक आधार पाटील यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी मोलाचे सहकार्य दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी सी सोनवणे व आर के भावसार यांनी केले.