• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, June 11, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home महाराष्ट्र

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने तातडीने कृती करावी ! – दादर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी

माणगंगा by माणगंगा
August 12, 2024
in महाराष्ट्र
0
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने तातडीने कृती करावी ! – दादर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने तातडीने कृती करावी ! – दादर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात मागणी

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

मुंबई - बांगलादेशात आरक्षणाच्या सूत्रावरून सरकारविरोधी आंदोलनात झालेल्या हिंसाचारामुळे तेथे अराजक माजले आहे. या सरकारविरोधी आंदोलनात जिहादी आणि कट्टरतावादी जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्या उघडपणे हत्या करत आहेत. हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंची घरे आणि दुकानांवर आक्रमणे करून ते लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे-आग लावणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे. बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार होत आहे आणि तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण अजूनही आहे. बांगलादेशमधील हिंदूंची विदारक स्थिती पाहता हिंदूंच्या रक्षणासाठी बांगलादेशातील समाजकंटकांवर भारत सरकारने कारवाई करावी आणि *बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार थांबवून त्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी भारत सरकारने तातडीने कृती करावी !, अशी आग्रही मागणी मुंबईतील दादर पूर्व येथील रेल्वे स्थानकाजवळ 11 ऑगस्ट या दिवशी ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या वतीने आयोजित ‘हिंदु-राष्ट्र जागृती आंदोलना’त करण्यात आली.*

‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या आंदोलनात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मानव सेवा प्रतिष्ठान, वज्र दल, योग वेदांत समिति, सुयश मित्र मंडळ, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती आदी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदूंनी हातात प्रबोधनपर फलक धरले होते आणि घोषणाही देण्यात आल्या. या वेळी शासनाला देण्यात येणार्‍या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक कार्याध्यक्ष श्री रणजित सावरकर यावेळी म्हणाले, ‘बांगलादेशातील आंदोलन हिंदूविरोधी झाले आहे. भारत सरकारने बांगलादेशाच्या विरोधात तत्परतेने कारवाई करावी. भारताने बांगलादेशमध्ये सैन्य घुसवून बांगलादेशातील हिंदूबहुल भाग भारताला जोडावा.’ ‘बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलो नाही, तर भारतातील हिंदूंचेही भवितव्य धोक्यात आहे, असे सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री अभय वर्तक यावेळी म्हणाले. तर मानवाधिकार कार्यकर्ते श्री. महेश वासू म्हणाले, ‘बांगलादेशातील स्थिती हिंदूंची अत्यंत भयावह आहे. भारतातील हिंदूंपर्यंत हा अत्याचार पोचवायला हवा.हिंदूंच्या नरसंहाराविषयी बांगलादेशी प्रसारमाध्यमे गप्प आहेत.’

बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या बांगलादेशमध्ये स्थापन झालेले अंतरिम सरकार आणि सैन्य दल यांनी बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले, घरांची लूट, मंदिरांवरील हल्ले, मूर्तींची तोडफोड, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, हिंदूंना तातडीने सुरक्षा पुरवून आतापर्यंत तेथील हिंदूंच्या जीवित वा मालमत्ता यांची जी हानी झाली असेल, त्याची तातडीने भरपाई करावी आदी मागण्या पूर्ण होण्यासाठी भारत सरकराने सध्याच्या बांगलादेशमधील अंतरिम सरकारवर दबाव आणावा असे या आंदोलनात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींनी आवाहन केले.

बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्‍या अत्‍याचारांच्‍या विरोधात बांगलादेश, संयुक्‍त राष्‍ट्रांचे मुख्‍यालय यांसह जगातील विविध ठिकाणी आंदोलने होऊ लागली आहेत. हिंदूंच्या नरसंहाराचे गांभीर्य लक्षात घेता भारत सरकारनेही हा विषय तातडीने ‘संयुक्त राष्ट्र संघा’त मांडून बांगलादेशामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या शिष्टमंडळाला भेट देण्याची मागणी करावी. बांगलादेशातील हिंसाचारामुळे तेथील जे हिंदु विस्थापित होऊन भारतात आश्रय मागत असतील, त्यांना ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’द्वारे (सीएए) भारत सरकारने आश्रय द्यावा. आदी मागण्याही भारत सरकारकडे या हिंदू राष्ट्र-जागृती आंदोलनात केल्या आहेत.
Views: 146
Share

Related Posts

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,
महाराष्ट्र

कोंढावळ येथेशिक्षक दिनानिमित्त गुरुजनांचा सन्मान,,,,,,,

September 7, 2024
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या विद्यमाने सैतवडे येथील दि मॉडेल इंग्लिश स्कुलमध्ये गणित विषयाची विशेष कार्यशाळा संपन्न

August 24, 2024
शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट
महाराष्ट्र

शिरपूर तालुक्यातील 50 ते 60 शेतकऱ्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन परळी वैद्यनाथ येथे भेट

August 23, 2024
हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड
महाराष्ट्र

हुबालवाडीच्या उपसरपंचपदी सौ.सुवर्णा सुनील फुलारे यांची निवड

August 18, 2024
अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव
महाराष्ट्र

अभानपुर येथे गोकुळ अष्टमी निमित्ताने श्री गोसावी बाबा यात्रा उत्सव

August 18, 2024
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार
महाराष्ट्र

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा उपक्रमसामाजिक कार्याची दखल, सखाराम बोबडे पडेगावकर यांचा मंगळवारी गंगाखेडात सत्कार

August 17, 2024
Next Post
तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आठवणींच्या हिंदोळ्यावर….;आठवणी बापुसाहेब परांडेंच्या….;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • माझंही मत;निमित्त छगन भुजबळांच्या त्राग्याचे;ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!
  • १३ जून रोजी ऊरूण ईश्वरपूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूकीचे आयोजन
  • परतवाडा येथील कथित सेक्स स्कँडलची उच्चस्तरीय न्यायिक चौकशी व्हावी…. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्सच्या सत्यशोधन समितीचीमागणी.

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)