!! चलो मुंबई!! चलो मुंबई!!
नाभिक समाजाच्या न्याय व हक्कासाठी ३०सप्टेंबर २०२४ आझाद मैदान मुंबई !!
!!समाज बांधवांनो अभी नही तो कभी नहीं!!
त-हाडी –
संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ( महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उप कंपनी) आपल्याला वैयक्तिक नाभिक समाजासाठी संत सेनाजी महामंडळ केश शिल्पी महामंडळ राज्य सरकारने स्वतंत्र दिलेलेच नाही, (जसे इतर समाजाला वैयक्तिक दिलेले आहे) जेव्हा हा जीआर निघाला तेव्हा आपल्या समाजातील ( या संत सेनाजी महाराज के शिल्पी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी शर्यतीत असलेल्या समाजातील पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीची दखलच घेतली नाही) आणि सरकारला या गोष्टीसाठी बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला ( आपल्याला स्वतंत्र श्री संत सेनाजी महाराज के सेल्फी महामंडळ) मिळालेच नाही
आपण ( महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची उप कंपनी) म्हणून पाठिंबा देणारे गाफील राहिले सर्व समाज अज्ञात राहिला अरे समाज मोठा करायचा असेल तर पदापेक्षा समाजाला महत्त्व द्या तरच कुठे समाजाची किंमत होईल वैयक्तिक स्वार्थ साधण्यापेक्षा समाजाचा स्वार्थ साधा , राजकीय क्षेत्रातील व्यक्ती आपल्या समाजात हा माझ्या जवळचा तो माझ्या जवळचा असे म्हणून फक्त आपल्या समाजाचा वापर करून घेतो ही बुद्धिमत्ता तुम्हाला कधी येईल जोपर्यंत आपण संघटित होत नाही, एकसंघ होत नाही,
तोपर्यंत कुठलाही पक्ष असू द्या वा सरकार असू द्या आपली कुणीच किंमत करणार नाही कारण सरकारने जरी ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ स्थापन केले असेल परंतु जाचक अटी अशा काही लावलेल्या आहेत यातून माझ्या समाज बांधवाला कुठलाही फायदा होणार नाही, जोपर्यंत या जाचक अटी ते काढत नाही, तोपर्यंत संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ यांच्या माध्यमातून समाजाला कुठलाही फायदा होणार नाही, योजना देऊन महाराष्ट्र सरकारने नाभिक समाजाच्या तोंडाला पाणी पुसलेले आहेत ,मी आजच जळगाव येथे महाबळ परिसरात ओबीसी आर्थिक विकास महामंडळ या कार्यालयाला भेट देऊन सविस्तर माहिती घेतली त्या ठिकाणी वसुली निरीक्षक यांची भेट झाली,
समाजाचे व्यक्ति असून खूप समजूतदार गरिबीची जाणीव असलेले व्यक्तिमत्व आहे ,संपूर्ण माहिती समजावून सांगितली संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ म्हणजे एक प्रकारे नाभिक समाजाची सरकारने केलेली थट्टाच आहे अरे एक लाखाचं बिनव्याजी कर्ज देता हे समाजाला दाखवता परंतु त्या कर्जासाठी (१४अटी ) ज्या अटी टाकलेल्या आहेत त्यात प्रामुख्याने अटी अशा की दोन जामीनदार लागतील ते सुद्धा फक्त महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी , सेंट्रल गव्हर्मेंटचा कर्मचारी चालणार नाही , पोस्ट ऑफिसचा कर्मचारी चालणार, नाही , कोर्टातील कर्मचारी चालणार नाही, रेल्वे कर्मचारी चालणार नाही, बँकेचा कर्मचारी चालणार नाही,
यांना फक्त महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी चालतील, तेही ज्यांची सेवा (म्हणजेच रिटायरमेंट) आठ वर्षाच्या आतील असेल , म्हणजे जे आठ वर्षानंतर रिटायर होतील ते सुद्धा चालणार नाहीत बंधूंनो तुम्हाला वाटत नाही का की या सरकारने आपल्या समाजाची एक प्रकारे थट्टाच केलेली आहे जोपर्यंत सरकार या जाचक अटी काढत नाही तोपर्यंत या कर्जाचा कुणालाच फायदा नाही कारण आपल्या समाजात १०% टक्केच लोक शासकीय सेवेत आहेत व ९०% लोक हे व्यवसायात आहेत ,
व्यवसायिक लोकांनी एकत्र होणे हे फार गरजेचे आहे आपण जर एक झालो ना तर महाराष्ट्रात सरकार कोणाचे आणायचं हे ठरवण्याची ताकद सुद्धा आपल्यात आहे परंतु आपण संघटित नाही याचाच फायदा हे राजकीय लोक घेत आहेत आपल्या राज्यस्तरीय व स्थानिक पदाधिकारी जे राजकारणांच्या संपर्कात आहे किंवा त्यांना फक्त संत सेनाजी केश शिल्पी महामंडळाचे पद मला मिळावं याच अपेक्षेत जगत आहेत त्यांनी पदाची अपेक्षा सोडून द्यावी माझा तर त्यांना महत्त्वाचा सल्ला असेल जर तुम्हाला समाजाची कळवळा असेल खरच समाजाविषयी आस्था असेल (पद महत्त्वाचं की समाज) तर समाजासाठी राजकीय पदाचा सुद्धा त्याग करण्याची भूमिका ठेवली पाहिजे जर समाजाच्या नावावर राजकीय पद भोगत असाल आणि समाजाची दुर्दशा होत असेल तर तुमच्यासारखी स्वार्थी आणि पद भोगू दुसर कोणी असू शकत नाही या राजकारण्यांना सुद्धा कळू द्या की या नाभिक समाजाची राजकीय लोकं आपल्यापासून दूर जात आहेत सर्व राजीनामे देत आहेत तेव्हा कुठे या राजकारणान्याना समाजाची ताकद कळेल पण असा त्याग करणारा असा मायेचा लाल कोणी आहे का.?
हेही समाजाला कळू द्या तुम्ही जर समाजाची बाजु मांडू शकत नसाल तर राजकीय पदावर सुद्धा तुम्हाला राहण्याचा काहीच अधिकार नाही परंतु तुम्हाला समाजाच्या संघटनेवर सुद्धा पद पाहिजे व राजकीय क्षेत्रात सुद्धा पद पाहिजे तर तुम्ही काय समाजाला न्याय द्याल एका बाजूला मराठा समाजाची ताकद बघा बंधूंनो आजच वेळ आलेली आहे आपला समाज बांधव ज्यांनी हा पुढाकार घेतलेला आहे श्री किरण भाऊ भांगे व सर्व सकल नाभिक समाज बांधव यांच्या पाठीशी उभे राहून ३० सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्रातील तमाम सर्व नाभिक समाज बांधव.यांनी उपस्थित राहून व महाराष्ट्रातील सर्व नाभिक समाजातील संघटना ,जिल्हा, तालुका ,शहर ,गाव, पातळीवरील सर्व समाज बांधवांनी आता सर्व हेवेदावे , गट तट ,इगो, सोडण्याची वेळ आलेली आहे खरच समाजाविषयी कळवळा असेल तर अभी नही तो कभी नही या उद्देशाने आपल्या समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी सर्वांनी या एक दिवसीय आंदोलनामध्ये. सहभागी व्हावे व समाजाची ताकद या राजकर्त्यांना दाखवून द्यावी ही आग्रहाची व कळकळीची नम्र विनंती.
आपलाच समाज बंधू
महेंद्र खोंडे त-हाडी पत्रकार
ता शिरपूर जि धुळे
महाराष्ट्र राज्य नाभिक सेना
महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख