विधानसभा निवडणुकीत राजेंद्रअण्णा देशमुख व ब्रह्मानंद पडळकर यांनी एकत्र यावे विभूतवाडीकरांची मागणी
आटपाडी प्रतिनिधी
खानापूर आटपाडी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी गाव भेतिच्या कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमात राजेंद्रअण्णा देशमुख हे विभूतवाडी ता .आटपाडी येथे गाव भेटीसाठी आले होते.या वेळेला गावातील सर्वच पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते .तालुक्याचे नेते व माजी आमदार गावामध्ये येणार आहेत म्हटल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी गट ..तट विसरून सर्वजण एकत्र आले होते. ही विभूतवडीकारांची कायम स्वरूपी परंपरा आहे पक्ष कोणताही असो गावात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करणे ही गावची परंपरा आजही सुरू आहे
या वेळेला गावातीलच सरपंच सुरज पाटील राष्ट्रवादीचे प्रा.एन. पी .खरजे, संदीप इनामदार नाना दाजी मोटे नाना निवृत्ती मोटे ,भाजपचे नेते व माजी सरपंच चंद्रकांत पावणे असे अनेक पुढच्या फळीचे कार्यकर्ते नेते उपस्थित होते या वेळेला एन.पी खर्जे ,चंद्रकांत पावणे, नंदकुमार इनामदार ,संदीप इनामदार, सरपंच सुरज पाटील,पी.पी.जानकर व अन्य नेत्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.
या वेळेला सर्वच ग्रामस्थांनी व नेत्यांनी माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख व माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी एकत्र यावे अशी मागणी केली आणि याच विषयावर चर्चा रंगली होती. तर चंद्रकांत पावणे व प्रल्हाद जानकर यांनी ब्रह्मानंद पडळकर व राजेंद्रअण्णा देशमुख यांची बैठक घडवून आणावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली व तालुक्यातील एकच उमेदवार द्यावा अशी जोरदार मागणी झाली या वेळेला मार्केट कमिटीचे माजी सभापती भाऊसाहेब गायकवाड उपस्थित होते. या मागणीनंतर राजेंद्र अण्णा देशमुख म्हणाले तुम्ही वेळ व ठिकाण ठरवा माझी येण्याची तयारी आहे.
या वाक्यावरून काही कार्यकर्त्यांनी माजी सरपंच चंद्रकांत पावणे व सामाजिक कार्यकर्ते प्रल्हाद जानकर यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. हे दोन्हीही युवा कार्यकर्ते हे पडळकर बंधू यांचे समर्थक आहेत व गावातील पडळकर गटाचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून यांना ओळखले जाते .वेट अँड वॉच आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेने एक-दोन दिवसांमध्ये पडळकर देशमुख यांची बैठक होते की नाही ,
कार्यकर्ते कितपत धावपळीने बैठकीचे आयोजन करतात ,हे एक-दोन दिवसांमध्ये समजून येईल .तर ग्रामस्थांनी माजी आमदार देशमुख यांच्याकडे एकच मागणी केली की तालुक्यातील एकच उमेदवार असावा मग पडळकर असो किंवा तुम्ही असा परंतु एकच उमेदवार द्या अशी जोरदार मागणी केली आहे. या वेळेला माजी सभापती भाऊसाहेब गायकवाड आर.पी.आयचे राजेंद्र खरात व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.