देवरस्ट्रे येथील सागरेश्वर अभयारण्यातील गोस्ट पन्नास वर्षांपूर्वी लावलेल्या झाडाची.
देेवराष्टे ( ता. कडेगांव ) येथील स्व. यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याच्या निर्मितीला शनिवारी ( ता. २१ ) रोजी पन्नास वर्ष होत आहे. देशातील पहिले मानवनिर्मित अभयरण्याचा आवर्जून उल्लेख केला जातो. त्यानिमित्त त्याच्या निर्मितीचा घेतलेला मागोवा…
ही गोष्ट आहे सांगली जिल्ह्यातील देवराष्टे येथील स्व. यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याच्या निर्मितीची. तारीख होती २१ आॅगस्ट १९७१. वेळ : रात्रीच्या साडेअकरा – बाराची…त्यात आमवश्या किर्रर करणारा अंधार… ध्येयवेडा माणूस आपल्या मोजक्या सहकार्यांना घेऊन सागरोबाच्या डोंगरात डोंगर हिरवाई डोंगर नटविण्याचे स्वप्न घेऊन आलेला. रात्रीच्या गडद अंधारात कांचन वृक्षाचे रोपण केले जातं. उपस्थित लोक व टाळ्यांचा गजर करतात. अन् एकच घोषणा देतात. भारत माता की जय… वंदे मातरम….घोषणा देणाऱ्या त्या भल्या माणसाचं नाव आहे धोंडिराम महादेव मोहिते. अर्थात धों.म. मोहिते. पुढे धों.म. या नावाने राज्यभर परिचित झाले ते देशातील पहिल्या मानवनिर्मित सागरेश्वर च्या अभरण्यामुळे.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती होऊन जेमतेम दहा – अकरा वर्षे झाली होती.
त्याच दरम्यान, राज्यशासनाने महाराष्ट्रातील पत्रकारांचा ताडोबा जंगलाचा अभ्यास दौरा आखला होता. त्यामध्ये किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंदराव किर्लोस्कर यांनी धों. म. यांना अभ्यास दौर्यात सहभागी होण्याची संधी दिली. त्या अभ्यास दौर्यात सागरेश्वर अभयारण्य निर्मितीची बीजं रूजली गेली . त्यातून धों.म.नी सागरेश्वर च्या डोंगरावर झाडे लावण्याचा संकल्प केला.
त्या नुसार २१ आॅगस्ट १९७१ या अमावश्याच्या पहिला वृक्ष लावला. दुसर्या वर्षी महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती उद्भवली. लोकांना रोजगारांची मोठ्या प्रमाणात गरज भासू लागली. धों. म. नी शासनाकडे पाठपुरावा करुन रोजगार हमी योजनेअंतर्गत डोंगरावर जाणारे रस्ते तयार मोहिम हाती घेतली. शासनाने तत्परता दाखवत रस्ते , आजूबाजूला वृक्षारोपण करण्यात आले. शासनाने लावलेली झाडे त्यांनी जागविली. अभरण्याच्या निर्मितीत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बॅरिस्टर ए. आर. अंतुले, राष्ट्रवादी चे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मोठी मदत केली. त्यांनी दाखवलेल्या सहभूतीतून सागरेश्वर ओसाड डोंगरावर अभयरण्य नावारुपाला आले. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना वृक्षमित्र ही पदवी बहाल करण्यात आली.
त्याचे पुत्र रानकवी सु. धों. यांनी वडिलांच्या विचारांचा वसा – वारसा पुढे नेटाने चालविला. अभयारण्यात चंदन, हावडा,बाभूळ वृक्षाबरोबरच जंगली वृक्षही पहावयास मिळतात .करवंद ,बोर, या रानमेव्यांच्या जाळयाही जागो-जागी आहेत. चिमणी पोपट ,जंगली कोंबड्या ,मोर -लांडोर ,कोकीळ ,पोपट,आदी पक्षीही स्वच्छंदपणे विहारताना पहावयास मिळतात. हरीण , काळवीट , सांबर , लांडगे , कोल्हे , तरस आदी प्राण्यांचे दर्शन होते. डॉ. पतंगराव कदम वनमंत्री असताना सागरेश्वर अभयारण्याची कुंपन भिंत व सुशोभिकरण्यावर भर दिला होतो.
सागरेश्वर अभयारण्याच्या निर्मितीने सांगली जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार नेलेल्या वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या अभयारण्य उभारणीतील योगदानाची घेऊन महाराष्ट्र शासनाने १ मे १९८१ रोजी महाराष्ट्र दिनी त्यांचा ” वृक्षमित्र ” हा किताब देवून त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला. तर केंद्र शासनाच्या ” इंदिरा प्रियदर्शनी ” पुरस्कारासह राज्यातील अनेक संस्थांचे त्यांना पुरस्कार मिळाले
वृक्षमित्र धों. म. च्या नावे पर्यावरणात झोकून देऊन काम करणार्या पत्रकारास ” वृक्षमित्र धों.म. मोहिते पर्यावरण संवर्धन पत्रकार ” पुरस्काराने सन्मानित केले जाते. यासह वृक्षसंवर्धनसा ते मनापासून काम करतात. नातू प्रा. रोहित , मंगेश हे ही अभयरण्याच्या कामात खांद्याला खांदा लावून काम करतात. रक्तदान शिबीर, वृक्षारोपण यासह विविध उपक्रम राबवित असतात. सु. धों. यांचा नातू पणतू जयराज याने नुकताच वृक्षारोपण करण्यात आले. चौथी पिढी सागरेश्वर अभयारण्याशी कनेक्ट झाली आहे.
दृष्टीक्षेपात अभयारण्य :
सुमारे १०.८७ चौ. कि. मी. विस्तारित क्षेत्र.
किर्लोस्कर पॉईंट.
महानगुंड रणशूळ पॉईंट.
वेणू विहार.
छत्री बंगला. यासह अनेक निसर्गरम्य ठिकाणे
………………..






