: सातेवाडी ग्रामपंचायतीचा कोरोना योध्दा-२०२१ पुरस्कार डॉ.संतोष मोरेंना
ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष मोरे यांनी सदिच्छा फौंडेशनच्या माध्यमातुन विवीध सामाजिक उपक्रम राबवले आहेत.तसेच त्यांनी गोरगरीबांसाठी रुग्णवाहिका सुरु केली आहे.ते वडूज पेडगावसह संपुर्ण खटाव तालुक्यासाठी देवदूत ठरत आहे
.मायणी मेडीकल कॉलेज असो वा वडूजसह सातेवाडी कोरोना सेंटर सर्व ठिकाणी कोरोना काळात हजारो रुग्णांवर जिवाची पर्वा न करता उपचार करण्याचे काम डॉ.मोरे यांनी केले.सुरवातीपासूनच त्यांना सामाजिक कामाची आवड असल्याने ते रुग्णांवर मोफत तपासणी शिबीराचे आयोजन करत असतात.
जिद्द व चिकाटीने त्यांनी आजपर्यंत वाटचाल करत खटावसह सातारा जिल्ह्यातील रुग्णांवर त्यांना उपचार केले दि:२९ रोजी त्यांनी NAB नेत्र रुग्णालय मिरज व सदिच्छा हॉस्पिटल वडूज यांचे संयुक्त विद्यमाने तब्बल ६१ रुग्णांची तपासणी करुन २६ रुग्णाना शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले असुन त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करुन नवा अध्यायच रचला आहे.त्यामुळे त्यांना सातेवाडीकरांनी कोरोना योध्दा-२०२१ पुरस्काराने सन्मानित केले.यावेळी खा.रणजितसिंह ना.निंबाळकर,आ.जयकुमार गोरे,आ.गोपिचंद पडळकर,सदाशिव खाडे,विलास देशमुख,डॉ.वैभव माने,धनंजय चव्हाण उपस्थित होते







