तालुक्यातील जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत योजनांचे काम ठप्प…. करोडो रुपये खर्च…..नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळणार कधी मिळणार ? सर्रास कामे अपूर्ण…..
माणगंगा प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी शासनाने जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत पाणीपुरवठा योजना सुरू केली असून अनेक दिवसापासून पाणीपुरवठा योजनाचे काम सुरूच आहे.पण पाईप लाईन चे काम काय पूर्ण झाले नाही, त्यामूळे अद्याप अनेक गावांमध्ये नळाला पाणीच आलेच नाही. असा प्रकार घडला आहे. तर अनेक ठिकाणी चारी पाडले आहेत. परंतु पाईप गाडले नाहीत काही ठिकाणी पाईप गाढले आहेत संपूर्ण तालुक्याचा विचार केला तर संपूर्ण योजना ही अपूर्णच आहेतर जवळपास 80 टक्के पाणीपुरवठा योजनांचे काम बंद अवस्थेत आहे.
अशी वस्तुस्थिती असल्याने शासनाचे करोडो रुपये वाया जाण्याची शक्यता आहे.यामध्ये शासनाच्या अहवालानुसार 49 गावांमध्ये पाणीपुरवठा योजना सुरू आहे .त्यापैकी 28 कामे पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू आहे. तर 19 कामे प्रगतीपथावर आहेत. तर दोन गावांमध्ये काम पूर्ण झाले आहेत. असा अहवाल शासनाकडून मिळाला आहे.प्रत्यक्ष मात्र पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण झाली नाहीत. काही गावांमध्ये पाईपलाईन पुरण्यासाठी चारी काढल्या आहेत .तर काही गावांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाईप पुरलेली आहे .म्हणजे सर्वच ठिकाणी कामे अपूर्ण अवस्थेत आहेत असे म्हटले तर वावगे होणार नाही.पुढील गावांमध्ये कोठ्यावधीचा निधी दिला आहे. परंतु पाणीपुरवठ्याची कामे अपूर्णच आहेत ,
यामध्ये आंबेवाडी 44.28 लक्ष, आवटेवाडी २3.36 लक्ष, बाळेवाडी 42.90 लक्ष, बनपुरी 199.61 लक्ष, भिंगेवाडी 36.26 लक्ष, बोंबेवाडी 72.77 लक्ष, चिंचाळे 79.62 लक्ष, देशमुख वाडी 33.08 लक्ष, धावडवाडी 22.33 लक्ष, गळवेवाडी 92.13 लक्ष, घाणंद 64.60 लक्ष, घरनीकी 1, 50, 73 लक्ष, गोमेवाडी 1,99, 74 लक्ष, काळेवाडी 64.68 लक्ष, कामथ 63.29 लक्ष, कानकात्रेवाडी 34.82 लक्ष , कौठूळी 1,09.99 लक्ष, खांजोडवाडी 38.18 लक्ष, खरसुंडी 1,92.16 लक्ष, कुरुंदवाडी 43.13 लक्ष, लेंगरेवाडी 33.49 लक्ष, लिंगीवरे 130.05 लक्ष, माडगुळे 28.38 लक्ष, माळेवाडी 31.61 लक्ष, मानेवाडी 41.86 लक्ष, मापटे मळा 170.54 लक्ष, मासाळवाडी 15.29 लक्ष, मिटकी 62.8 लक्ष, मुढेवाडी 39.10 लक्ष, नेलकरंजी 1,00.7 लक्ष, निंबवडे 2,22.65 लक्ष ,पडळकरवाडी 64.94 लक्ष, पळसखेल 2,21.42 लक्ष, पारेकरवाडी 61.21 लक्ष, पात्रेवाडी 32.8 लक्ष, पिंपरी खुर्द 74.32 लक्ष, पुजारवाडी 22.46 लक्ष, पुजारवाडी दिघंची 1,18.92 लक्ष ,राजेवाडी 1,12.65 लक्ष, शेटफळे 1,99 लक्ष, तळेवाडी 1,32.69 लक्ष, उंबरगाव 1,08.81 लक्ष ,गुळेवाडी 19. 4 लक्ष, विभूतवाडी 3,72.18 लक्ष, विठलापूर 99.75, लक्ष वाक्षेवाडी 27.87 लक्ष वलवन 83.60 लक्ष,यापा. वाडी 27.7 लक्ष, झरे 176. 80 लक्ष एवढ्या मोठ्या रकमेच्या जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत पाणीपुरवठा होणार आहे
. परंतु सर्रास गावामध्ये पाईप लाईन ची कामे ठप्प आहेत. काही ठिकाणी पाईपलाईन साठी चारी पाडलेल्या आहेत, काही ठिकाणी पाईपा गाढलेल्या आहेत. तर अनेक ठिकाणी कामकाजाला सुरुवातच झाली नाही. अशी अवस्था या जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठ्याची झाली आहे. वरील कोट्यावधीची योजना पूर्ण होऊन गावाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या अपेक्षेने ग्रामस्थ वाट पाहत आहेत .योजना पूर्ण कधी होणार आणि पाणी कधी मिळणार ही अपेक्षा ग्रामस्थांकडून होत आहे.
चौकट… जर तालुक्याला वरदान ठरणारी धनगाव योजना पूर्ण झाली असती, तर शासनाचा कोठ्यावधीचा निधी वाचला असता, किंवा जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना करण्याचे काही कामच नव्हते. ज्या गावांमध्ये योजना अपूर्ण आहेत, त्या गावातील योजना पूर्ण होऊन ग्रामस्थांना पिण्याचे शुद्ध पाणी कधी मिळणार का ? याची वाट ग्रामस्थ पाहत आहेत. यंदाही तालुक्यामध्ये टँकर सुरू करण्याची वेळ आली आहे. जर पाणीपुरवठा योजना पूर्ण झाली असती तर टँकरचा शासनाचा खर्च वाचला असता.
2… धनगाव योजनेचे शुद्ध पाणी तालुक्याला मिळणार होते परंतु अनेक कारणास्तव ही योजना बंद अवस्थेत आहे धनगाव योजना जर पूर्ण झाली असती तर जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत पाणीपुरवठा योजना करण्याची काहीच गरज नव्हती तर कोट्यवधीचा निधी वाचला असता.
3.. तर अनेक गावांमध्ये नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सत्तांतर झाले आहे. तर काही ठिकाणी सत्ता अबाधित राहिली आहे. तेथे मात्र वादाची ठिणगी पेटली आहे. श्रेयवादासाठी राजकीय कार्यकर्त्यांची धडपड सुरू आहे. माझ्या काळातील योजना मी पूर्ण करणार तर नूतन पदाधिकारी म्हणतात आम्ही काम पूर्ण करणार असा श्रेयवाद सुरू आहे. संपूर्ण तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे काम बंद अवस्थेत असून काम पूर्ण करण्यासाठी त्या त्या स्थानिक नेत्यांचा पुढाकार नाही परंतु श्रेय वादासाठी मात्र वादविवाद सुरू असलेले दिसून येत आहेत. टेंभू योजनेचे पाणी गावागावात आले असते तर अशा योजनांची गरजच नाही असे अनेक नागरिकांचे मत आहे.
4…… धनगाव योजनेची माहिती विचारण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला असता अधिकारी उपस्थित नसून ते मीटिंगसाठी गेले असे सांगितले तर अन्य दुसऱ्या अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही..व साध्य परिस्थितीची कोणतीही माहिती मिळाली नाही. गेले अनेक वर्षापासून काम ठप्प आहे.
प्रतिक्रिया….१….संबंधित कार्यालयाच्या म्हणण्यानुसार काम पूर्ण होऊन पाणी पुरवठा सुरू असलेली गावे बाळेवाडी,खान्जोडवाडी,माळेवाडी,मानेवाडी,मुढेवाडी,नेलकरंजी, गुळेवाडी,वाक्षेवाडी,शेटफळे,पारेकरवाडी…२…कामे अपूर्ण असलेली गावे काम पूर्ण असलेल्या योजना (अंतिम केलेल्या योजना) भिंगेवाडी,बोंबेवाडी,चिंचाळे,गळवेवाडी,घानंद,घरनिकी,कानकात्रेवाडी,खरसुंडी,मापटेमळा,मासाळवाडी,मिटकी,पात्रेवाडी,पूजारवाडी दि.,राजेवाडी,तळेवाडी,देशमुखवाडी,पडळकरवाडी,य.पा.वाडी,औटेवाडी,धावडवाडी,कुरुंदवाडी,माडगुळे, लिंगवरे३.. येथील काम प्रगतीपथावर असलेल्या योजना आंबेवाडी,बनपुरी, गोमेवाडी,कामथ,कोठुळी,लिंगीवरे,निंबवडे,पळसखेल,उंबरगाव,विभूतवाडी,विठलापूर झरे,पिंपरी खुर्द,पुजारवाडी आ.,काळेवाडी,वलवण या गावामध्ये युद्ध पातळीवर काम सुरू असल्याची माहिती जलजीवन मिशन चे अधिकारी यांनी दिली.





