• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, April 23, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home Uncategorized

मुंबईतील समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी आटपाडी त उपोषण

माणगंगा by माणगंगा
April 21, 2026
in Uncategorized
0
मुंबईतील समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी आटपाडी त उपोषण

मुंबईतील समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी आटपाडी त उपोषण

महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे समुद्रात उभारण्यात येणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारकाचे काम सुरू करावे,आटपाडी कचरा मुक्त करावी यासाठी आटपाडी येथे 23 एप्रिल पासून उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते महेश पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे या नियोजनाच्या प्रती प्रधानमंत्री, मुख्यमंत्री व संबंधित कार्यालयाला पाठवलेले आहेत. निवेदनात म्हटले आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बांधकामात चा शुभारंभ होऊन अनेक वर्षे लोटली असली तरी अद्याप प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही.

ही बाब केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शिवप्रेमी व देशप्रेमी नागरिकांसाठी अत्यंत वेदनादायी आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कार्याचा जागतिक स्तरावर गौरव व्हावा आणि भावी पिढ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरात समुद्रामध्ये भव्य, दिव्य आणि जागतिक दर्जाचे स्मारक उभारणे अत्यंत आवश्यक आहे.या स्मारकामुळे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतील.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जागतिक स्तरावर पोहोचेल.महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि पर्यटन वाढीस चालना मिळेल.पर्यटनातून मिळणारा महसूल समाजातील गरजू, विद्यार्थ्यांसाठी, शेतकरी व व्यवसायिकांसाठी उपयोगात आणता येईल.देशाच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाला अधिक बळकटी मिळेल.तथापि, या अत्यंत महत्त्वाच्या प्रकल्पाचे काम अनेक वर्षांपासून का प्रलंबित आहे. याबाबत स्पष्ट माहिती जनतेसमोर आलेली नाही. तसेच, आलेले अडथळे अद्याप का दूर करण्यात आले नाहीत,

याबाबतही नागरिकांमध्ये संभ्रम आहे.तसेच या निवेदनात अनेक मुद्दे मांडले आहेत यामध्ये,या स्मारकाच्या प्रलंबित कामाबाबत सविस्तर स्पष्टीकरण द्यावे.प्रकल्पासमोरील अडथळे तात्काळ दूर करावेत. येत्या 1 मे 2026 पासून स्मारकाचे प्रत्यक्ष काम सुरू करण्यात यावे. आवश्यक असल्यास नागरिक व शिवप्रेमींकडून निधी उभारणीचा पर्याय विचारात घ्यावा.तसेच, या मागणीसाठी आम्ही सांगली जिल्‌ह्यातील आटपाडी येथे दिनांक 23 एप्रिल 2026 पासून शांततापूर्ण, कायदेशीर व संविधानिक मार्गाने धरणे आंदोलन करणार आहोत.

आमचा उद्देश केवळ शासनाचे लक्ष वेधून घेणे हा असून आंदोलन पूर्णपणे शांततेत पार पाडले जाईल.पण जर याची दखल घेतली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा विचार करावे लागेल असेही निवेदनात म्हंटले आहे. तसेच आपण या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ सकारात्मक निर्णय घ्याल, अशी आम्हा सर्व शिवप्रेमींची अपेक्षा आहे.फोटो.. महेश पाटील समुद्रातील नियोजित स्मारकशिल्लक आहेShow quoted text

Views: 88
Share

Related Posts

कृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभमहोत्सवात पांढरे जांभूळ, आंब्याच्या विविध १८ जाती व मिलेटचे १० विविध प्रकार
Uncategorized

कृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभमहोत्सवात पांढरे जांभूळ, आंब्याच्या विविध १८ जाती व मिलेटचे १० विविध प्रकार

April 23, 2026
खरसुंडी श्री सिद्धनाथ देवस्थानात चांदी अपहाराचा आरोप ! भाविकांनी केली थेट तक्रार
Uncategorized

खरसुंडी श्री सिद्धनाथ देवस्थानात चांदी अपहाराचा आरोप ! भाविकांनी केली थेट तक्रार

April 22, 2026
वाघडू .ता चाळीसगाव वाघडू येथे शेतकरी मेळावा संपन्न
Uncategorized

वाघडू .ता चाळीसगाव वाघडू येथे शेतकरी मेळावा संपन्न

April 21, 2026
आटपाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा! निर्भीड लेखणीचा सन्मान; सुधीर पाटील यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदानIAS प्रवीण कोळपे यांच्या हस्ते गौरव; आयडियल अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम
Uncategorized

आटपाडीच्या शिरपेचात मानाचा तुरा! निर्भीड लेखणीचा सन्मान; सुधीर पाटील यांना ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदानIAS प्रवीण कोळपे यांच्या हस्ते गौरव; आयडियल अकॅडमीचा स्तुत्य उपक्रम

April 20, 2026
जी.प.सदस्य माधवी पडळकर यांची जलव्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड
Uncategorized

जी.प.सदस्य माधवी पडळकर यांची जलव्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी निवड

April 20, 2026
झरेतील बँक ऑफ इंडिया चा मनमानी कारभार….. खातेदाराच्या सहमतीशिवाय परस्पर दुसऱ्या खात्यावर पैसे ट्रान्सफर….
Uncategorized

झरेतील बँक ऑफ इंडिया चा मनमानी कारभार….. खातेदाराच्या सहमतीशिवाय परस्पर दुसऱ्या खात्यावर पैसे ट्रान्सफर….

April 20, 2026
Next Post
वाघडू .ता चाळीसगाव वाघडू येथे शेतकरी मेळावा संपन्न

वाघडू .ता चाळीसगाव वाघडू येथे शेतकरी मेळावा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • कृषी पणन मंडळामार्फत शहरात मिलेट व फळ महोत्सवास प्रारंभमहोत्सवात पांढरे जांभूळ, आंब्याच्या विविध १८ जाती व मिलेटचे १० विविध प्रकार
  • खरसुंडी श्री सिद्धनाथ देवस्थानात चांदी अपहाराचा आरोप ! भाविकांनी केली थेट तक्रार
  • वाघडू .ता चाळीसगाव वाघडू येथे शेतकरी मेळावा संपन्न
  • मुंबईतील समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी आटपाडी त उपोषण

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)