माणगंगा न्यूज | विशेष वृत्त”चुकीचे वागणाऱ्या आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या सचिवावर कठोर कारवाई व्हावी” – ब्रह्मानंद पडळकर
आटपाडी | प्रतिनिधी
आटपाडी तालुक्यातील काही विकास सोसायट्यांमध्ये कर्जमाफी आणि पीककर्ज प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना चुकीची माहिती देणे, पात्र शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवणे आणि नियमबाह्य पद्धतीने कामकाज झाल्याच्या तक्रारी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत, तसेच स्वतःच कर्ज काढून कर्जमाफीत नाव येणे अशी भूमिका मांडत भाजप नेते ब्रह्मानंद पडळकर यांनी संबंधित दोषी सचिवांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पडळकर म्हणाले की, शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या किंवा त्यांना चुकीचे मार्गदर्शन करणाऱ्या अधिकाऱ्यांना व सचिवांना पाठीशी घालण्याऐवजी त्यांच्यावर तातडीने चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. कर्जमाफीसारख्या महत्त्वाच्या योजनेत शेतकऱ्यांची दिशाभूल होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, अशा प्रकारामुळे शासनाच्या योजनांवरील विश्वास कमी होतो.
त्यांनी प्रशासनाला आवाहन करत सांगितले की, ज्या शेतकऱ्यांना सचिवांच्या चुकीमुळे किंवा निष्काळजीपणामुळे कर्जमाफीपासून वंचित राहावे लागले आहे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि पात्र शेतकऱ्यांना तातडीने कर्जमाफीचा लाभ मिळावा.”शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळणे हीच आमची भूमिका आहे,” असेही ब्रह्मानंद पडळकर यांनी स्पष्ट केले…….
.. चौकट…..
हनुमान विकास सोसायटीच्या कार्यक्षेत्रामध्ये सचिव यांच्या नावावर कार्यक्षेत्रात कुठेही जमीन नाही. परंतु त्यांना पीक कर्जाचा कर्ज पुरवठा झाला व आतापर्यंतच्या काळामध्ये थकबाकीदार यादीमध्ये त्यांचे कधीही नाव आले नाही .आणि अचानक कर्जमाफीच्या यादीमध्ये प्रथम क्रमांकाला त्यांचे नाव आले ,असल्याने गावामध्ये खळबळ उडाली ज्या शेतकऱ्यांना जमिनी आहेत जे शेतकरी थकीत आहेत त्यांचे कर्ज माफी मध्ये नाव नाही. परंतु सचिवाचे नाव कर्जमाफीमध्ये प्रथम क्रमांकाला येणे हा एक गावातील शेतकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.२. तर या झालेल्या प्रकाराबद्दल शिवसेना नेते हनुमंत मोटे व भाजप नेते मोहन खरजे यांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रारी अर्ज दिला आहे व चौकशीची मागणी केली आहे







