शिक्षकांचे आर्थिक व सामाजिक मूल्य वाढविण्यात शिक्षक बँकेचा मोठा आधार..
जि प . अध्यक्षा प्राजक्ता ताई कोरे .
आटपाडी प्रतिनिधी
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या माध्यमातून शिक्षकांचे आर्थिक व सामाजिक मूल्य वाढविण्यात शिक्षक बँकेचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ताताई कोरे यांनी शिक्षक बँकेस सदिच्छा भेट देऊन नुकताच म्हैसूर येथे मिळालेल्या मानाच्या बँको पुरस्काराच्या सन्मानार्थ चेअरमन यु. टी .जाधव व व्हाईस चेअरमन राजाराम सावंत यांचा सन्मान केला.
त्यांनी शिक्षक बँकेच्या विविध योजनांचा आढावा घेत समाधान व्यक्त केले व सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन करून उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी शिक्षक बँकेचा दुर्दैवाने एखादा सभासद मयत झाल्यानंतर मृतसंजीवनी योजनेच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मदत कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत व्हाईस चेअरमन राजाराम सावंत यांनी केले. या वेळी बँकेचे चेअरमन यु टी .जाधव यांनी शिक्षक बँकेच्या माध्यमातून सभासद हिताच्या राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली.
शिक्षक समितीच्या पुरोगामी सेवा मंडळाच्या मार्गदर्शनाखाली राज्यनेते विश्वनाथ मिरजकर, माजी राज्य कोषाध्यक्ष किरणराव गायकवाड , राज्यसंघटक सयाजीराव पाटील,पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष किसनराव पाटील, सचिव शशिकांत भागवत, शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, सरचिटणीस दयानंद मोरे व सर्व संचालकांच्या सहकार्याने आम्ही बँकेची गतिमान प्रगतीची पावले टाकत आहोत असे सांगीतले.
यावेळी शिक्षक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी कोले, मॅनेजर महांतेश इटंगी, असिस्टंट मॅनेजर प्रमोद पाटील व विजय नवले ,विभुतवाडीचे सरपंच चंदकांत पावणे ,संजय थोरात, कैलास वाघमारेआदी उपस्थित होते.







