महात्मा फुले व महापुरुषांचे विचार आचरणात आणणे ही काळाची गरज आहे-माजी न्यायमूर्ती ऍड.मान्धाता झोडगे
फुले एज्युकेशन तर्फे सत्यशोधक पददतीने गृहप्रवेश सोहळा सम्पन्न
पाबळ/पुणे– फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन तर्फे पाबळ परिसरात प्रथमच फुलेनगर येथे श्रीमती संध्या आगरकर,उपाध्यक्ष, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद,पुणे जिल्हा यांच्या शांताध्या बंगल्याचा गृहप्रवेश सोहळा खरे शिक्षण व सामाजिक चळवळीचे उद्गारकर्ते महामानव फुले दांपत्य यांच्या सत्यशोधक पददतीने 5 सप्टेंबर 21 रोजी दु 1 वाजता सम्पन्न झाला.
यावेळी थोर समाजसुधारक महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास आणि संत शिरोमणी सावता महाराज यांच्या फोटो ला हार जेष्ठ समाजसेविका यमुनाबाई बनकर,सध्या आगरकर व माजी न्यायमूर्ती ऍड.मान्धाता झोडगे साहेब यांचे हस्ते अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी बापूसाहेब ढमढेरे ,शिरूर च्या नगरसेविका रोहिणी बनकर, विशाललिला सोसायटीच्या लता पवार,शालिनी वाळके,सुनीता पवार,प्रा. सकट,समता परिषद च्या पुणे अध्यक्षा सुनीता शेलवंटे ,नीलम गोरे,तेजश्री शेलवंटे ,राजू आगरकर ,जोती फुले- बनकर उपस्थित होते. याप्रसंगी श्रमाला प्रतिष्ठा देण्यासाठी बंगलयाचे काम करणारे कष्टकरी 9 कामगाराना जेवणाचे स्टील डबे आणि पूर्ण पोशाख देऊन सन्मान केला. सत्यशोधक गृहप्रवेश 2010 ला सुरु करणारे रोहिदास तोडकर, जागृती न्युज चे विनोद माळी आणि सुमित व संध्या आगरकर यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे गृहप्रवेशा बद्दल सन्मानपत्र व फुले एज्युकेशन तर्फे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा अध्यक्ष रघुनाथ ढोक व झोडगे साहेब यांचे शुभहस्ते भेट दिली तर आगरकर परिवारातर्फे सत्यशोधक समाज स्थापना दिन 23 सप्टेंबर 2021 ला 148 वर्ष पूर्ण होत असल्याने 148 मान्यवरांना महात्मा फुले गीत चरीत्र ,ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले आणि थोर ऐतिहासिक शूर महिला ग्रंथ भेट दिले तसेच गरजु महिलांना साड्या वाटप केले.
यावेळी झोडगे साहेब म्हणाले की महात्मा फुले व महापुरुषांचे विचार आचरणात आणणे काळाची गरज आहे.कोव्हिडं मुळे बहुजनांचे मुलाचे शिक्षण लयास जाऊ लागले आहे.महात्मा फुले यांनी विज्ञाननिष्ठ राहून स्वतः शिक्षण घ्या व इतराना शिक्षण घ्या असे देखील झोडगे साहेब म्हणाले.
सत्यशोधक ढोक म्हणाले की श्रमाला प्रतिष्ठा देण्यासाठी संध्या आगरकर यांनी कामगारांना संतुष्ट करून मोठे काम केले. हे भटजी च्या होमहवन ,सत्यनारायण पेक्षा किती तरी पटीने चांगले आहे,.पुढे ढोक असेही म्हणाले की महात्मा फुले यांचे विचार कृतीने आत्मसात करून सयाजीराव गायकवाड यांनी खरी सत्यशोधक चळवळ पुढे नेली तसेच त्यांनी महात्मा पदवी देण्यास मेघाजी लोखंडे व इतराना सांगितले.आपण ब्राम्हणाशिवाय धार्मिक विधी केला तर असफल होतो ही भीती दूर करून अंधश्रद्धा ,कर्मकांड , मुहूर्त याला फाटा देत आर्थिक उधळपट्टी न करीता सर्व कार्य पाडावे असे आव्हान देखील ढोक यांनी केले.
सत्यशोधक कार्याविषयी तोडकर यांनी सविस्तर माहिती देऊन संविधान उद्देशिका वदवून घेतली तर विधिकर्ते म्हणून रघुनाथ ढोक यांनी कार्य सिद्धीस नेऊन सत्याचा अखंड व सत्यशोधक आरती चे गायन केले.
यावेळी सुमित आगरकर याने मनोगत व्यक्त करताना या पुढे सर्व कार्य याच पददतीने करून मी सत्यशोधक पददतीनेच विवाह करणार असल्याचे म्हंटले व संध्या आगरकर म्हणाले की विज्ञान युग असतानाही आजपण विधवा महिलांना शुभकार्यात सन्मान मिळत नाही परंतु ढोक सरांनी पुणे येथून येऊन हा विधी मोफत केला त्याबद्दल आभार मानले.शेवटी गायिका अवंतिका मंडलिक हिने प्रवीण दवणे यांची ज्ञानज्योति कविता सादर करून सर्वांचे आभार मानले.
.







