नानासाहेब झुरे हा गावचा अमूल्य ठेवा : हभप हैबतराव पावणे
आटपाडी ;
निंबवडे येथे गणेशोत्सव निमित्त आयोजन करण्यात आलेल्या कार्यक्रमात हभप हैबतराव पावणे यांनी प्रतिपादन केले यावेळी बोलताना त्यांनी संगीतले नानासाहेब झुरे सर हे तुम्हाला लाभलेले परीस आहे . त्यांच्या सानिध्यात राहावा शंभर टक्के जीवनाचे सोने होणार, आज नवयुवक सांस्क्रुतिक तरूण गणेश मंडळ निंबवडे यांचेवतीने आज ह. भ. प. श्री. हैबतराव पावणे महाराज यांचे प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला .
सदर मंडळ नेहमी सामाजिक चालू घडामोडी वर आधारित कार्यक्रम घेऊन प्रबोधन करण्यात पुढाकार घेत असते, यावर्षीसुध्दा असाच कार्यक्रम लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायामाचे महत्व , योगासने प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आली
. पैसा धनदौलतीच्या पाठीमागे न लागता .आपले आरोग्य निरोगी कसे राहील याकडे लक्ष द्यावे असे मत आणि विचार श्री. नानासाहेब झुरे सरांनी मांडले. कोरोनाने या सर्व गोष्टी जगाला दाखवून दिल्या आहेत.
त्यामुळे मानसाने माणुसकी जपली पाहिजे. असे उदाहरणे देवून नानासाहेब झुरे सरांनी महत्व पटवून दिले. तसेच ह. भ. प. पावणे महाराजांनी आरोग्या बरोबरच वाचाल तरच वाचाल वाचण्यामुळे कोणत्याही स्पर्धेत यश मिळवू शकतो . या कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. गणेश गुरव सरांनी केले .मंडळाचे अध्यक्ष कुमार माने यांनी सर्वांचे स्वागत केले . आभार प्रदर्शन श्री. गणेश कबीर सरांनी केले या कार्यक्रमासाठी अमर माने, अमर मुढे सर व इतर सर्व मंडळातील सर्व सभासद , ग्रामस्थ होते.







