नाळीवरची तुटलेली लोखंडी जाळी देत आहे अपघाताला निमंत्रण…
नाळीवर लोखंडी जाळीचे काम लवकरच पुर्ण करावे अन्यथा आंदोलन करू :- एम.आय.एम पक्ष…
पुसद :- स्थानिक वसंतराव नाईक शाळा ते गुलाब नबी आझाद शाळा कडे जाणाऱ्या मार्गावर सतत वाहने व पायी जाणाऱ्या येणाऱ्या लोकांची या रोडवर नेहमीच गर्दी असते.त्या रस्त्याच्या मध्येभागी नाळीवरची लोखंडी जाळी तुटकी असल्याने तेथे खूप अपघात होत आहे. रस्त्यावरची तुटलेली जाळी लवकरात लवकर दुरुस्त करावी व तसेच शहरातील सर्व नाळी वरचे तुटलेली जाळी दुरुस्त करण्यात यावे.कोणतही प्रकारचा मोठ्या अपघाता पासून वाचवा व्हावे यासाठी तात्काळ नविन जाळी किवा त्या जाळीची दुरुस्ती करावी या साठी पुसद ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाने मुख्याधिकारी डॉ. किरण सुकळवाड नगर परिषद पुसद यांना एका निवेदनाद्वारे अशी मागणी केली.
निवेदन देते वेळी कृष्णा जाधव मराठवाड़ा व यवतमाळ वाशिम युवक उपाध्यक्ष, आवेस मिर्झा शहर कार्याध्यक्ष, फिरोज खान युवक तालुकाध्यक्ष ,शेख अतिक शहर व तालुका कार्याध्यक्ष,डॉ.अन्सार शेख शहर महासचिव,जिया उल हक तालुका महासचिव,शेख अर्शद शहर युवक महासचिव, सद्दाम निर्बान शहर व तालुका मिडीया प्रभारी, बाबाराव ढोले वंचित बहुजन आघाडी,सिद्धांत व अन्य नागरिक उपस्थित होते..







