• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Sunday, April 19, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सांगली

दिघंचीच्या विकासकामांत एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार नाही- सरपंच अमोल मोरे

माणगंगा by माणगंगा
September 15, 2021
in सांगली
0
दिघंचीच्या विकासकामांत एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार नाही- सरपंच अमोल मोरे

दिघंचीच्या विकासकामांत एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार नाही- सरपंच अमोल मोरे

दिघांची मधील विकासकामे पूर्णपणे पारदर्शक झलेली असून, त्यामध्ये एकही रुपयाचा भ्रष्टाचार आढळून आला नाही.

राजकीय दबावाने कामामध्ये अनियमितता आहे. असा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिला आहे. परंतु काही स्वयंघोषित नेते शब्दाचा खेळ करून लोकांची दिशाभूल करत आहेत.

दिघंची मधील विकास कामांचा रथ अडवण्यासाठी काही जणांचा हा तक्रारीचा उद्योग सुरू आहे.
असे परखड मत सरपंच अमोल मोरे यांनी पत्रकार परिषदेत मांडले.

 वर्षानुवर्षे प्रलंबित प्रश्न सत्तेवर आल्यानंतर निकाली काढण्यात आणि यशस्वी झालो.

आमदार अनिलभाऊ बाबर आणि तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिघंचीचा समावेश टेंम्भू योजनेत करून टेंम्भू चे पाणी दिघंचीत आले.
दिघंची च्या चोहोबाजूने कृष्णेचे पाणी खळखळनार आह .वर्षानुवर्षे तहानलेल्या वाड्यावर त्यांचा प्रश्न निकाली लागतोय. अनेक वाडी-वस्तीवर जाणारा रस्त्याचा प्रश्न तडजोडीने निकाली काढलाय.

एखाद्या शहरासारखी स्ट्रीट लाइट मुख्य रस्त्यावर केली आहे. वर्षानुवर्षे पत्र्याचे शेड मध्ये असणारे बसस्थानक सुसज्ज होणार आहे.

अशी कित्येक प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्यामुळे विरोधकांना आपली राजकीय दुकानदारी बंद पडण्याची भीती वाटत आहे त्यामुळे जिल्हा परिषदेत जाऊन तक्रार करायची आणि राजकीय दबावाचा वापर करून नोटिसा काढायला लावायचा हा उद्योग गेली तीन वर्षापासून सुरू आहे.

अनियमितता आणि भ्रष्टाचार यामध्ये फरक आहे
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या अहवालामध्ये एका ठिकाणी देखील भ्रष्टाचार किंवा अपहार या शब्दांचा उल्लेख नाही.
अनियमितता म्हणजे भ्रष्टाचार नसतो. परंतु काहीजण शब्दांचा खेळ करून लोकांची दिशाभूल करत आहेत. दिघंची च्या विकासामध्ये किती जरी अडथळे आले तरी या अडथळ्यांची शर्यत पार करून दिघंची चा विकास चौफेर सुरूच राहणार यात काही शंका नाही.

भ्रष्टाचारची तक्रार करणारेच भ्रष्टाचारी…..

ज्यांनी ग्रामपंचायत च्या कामाबाबत तक्रार दिली आहे त्यांच्यावर रस्ता न करता पैसे हडप केल्याबाबत गुन्हा दाखल आहे.त्यांच्या बंधुवर जिल्हा मध्यवर्ती बँकेत भ्रष्टाचार केला म्हणून त्यांची जिल्हा  बँकेतून  गेली दोन वर्षे झाले निलंबित करून हकालपट्टी करण्यात आली आहे.

दिघंची मधील युवक एकत्रित येऊन मैदानी खेळ खेळत होते.त्यामधून एखादा खेळाडू तयार होईल म्हणून यांनी क्रीडा संकुल चे वाटोळे करून टाकले. जेणेकरून गावातील एखाद्या युवकाची प्रगती होऊ नये.युवक एकत्रित येऊन उठाव होऊ नये.निकृष्ट कामाचा नमुना म्हणून क्रीडा संकुल कडे बघता येईल.
क्रीडा संकुल चे ठेकेदार यांचे बंधू च आहेत.बँकेत नोकरिला असताना यांनी बनावट कागदपत्रांच्या द्वारे ठेकेदार चे लायसन्स काढले. आणि मोठा भ्रष्टाचार केला.प्रताधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी सदर ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.परंतु राजकीय दबाब आणून त्यांनी प्रकारणाला स्थगिती दिली.

गारमेंट ला पाणी नेले पण साळशिंग मळ्यासहीत सर्व वस्त्या तहानलेल्या च ठेवल्या.

दिघंचीसाठी साडे तीन कोटी ची पाणी योजना मंजूर झाली.दिघंचीच्या वाड्या वस्तीचा समावेश त्यामध्ये होता परंतु दिघंचीचे मालक समजणाऱ्यानी पाईपलाईन न करता बोगस बिले काढली,गारमेंट ला पाणी गेलं पण साळशिंग मळा तहानलेला च ठेवला. साडे तीन कोटी योजनेत कोट्यवधी चा भ्रष्टाचार करून पाणी योजनेचे वाटोळे करून टाकले.
आज दिघंची गावाला दररोज पाणी देण्यासारखी परिस्थिती आहे.पाणी मुबलक आहे .परंतु यांच्या चुकीच्या पाणी योजनेमुळे गावाला रोज पाणी देणे अडचणीचे झाले आहे.


आमदार अनिल भाऊ बाबर व तानाजी राव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत सदस्य हे अभ्यासू व प्रामाणिक आहेत. सर्वांच्या व्यापक दूरदृष्टीने दिघंची चा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प आम्ही तडीस नेऊ. सर्वसामान्य जनतेच्या प्रेमावर व आशीर्वादावर आम्ही आमचा सत्तेचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.

यामध्ये कोणताही बदल होणार नाही. यापुढे देखील दिघंची च्या विकास कामांमध्ये भरच पडणार आहे. दिघंची ग्रामपंचायतचा कारभार स्वच्छ पारदर्शक असून याबाबतचा तीस हजार पाणी अहवाल ग्रामपंचायत ने तयार केला आहे.


दिघंची च्या विकास कामाबद्दल तक्रार देणाऱ्या सदस्य गेली दोन वर्षापासून मासिक मिटींगला हजर नाहीत त्यामुळे त्यांना तक्रार द्यायचं नैतिक अधिकार नाही


तरी देखील काही लोकांच्या संकुचित प्रवृत्तीमुळे दिघंची च्या विकासाला आडकाठी आणण्याचा केविलवाणा प्रयत्न गेली तीन वर्षापासून सुरू आहे.तो प्रयत्न त्यांनी असाच पुढे सुरु ठेवावा ,आम्ही आमच्या विकासाची गती अजून वाढवून दिघंचीचा लौकिक अजून वाढवु.
यावेळी पत्रकार परिषदेला विकास मोरे,बाळासाहेब होनराव,मुन्ना भाई तांबोळी,सागर ढोले ,राहुल पांढरे आदी उपस्थित होते.

Views: 1,162
Share

Related Posts

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……
सांगली

आटपाडी नगरपंचायत आगामी निवडणुकीत संतोष पाटील यांना जनतेची पसंती……

April 26, 2025
ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे
सांगली

ॲड वैभव पाटील यांना आमदार करण्यासाठी जीवाचे रान करणार : विजय आनुसे

August 17, 2024
सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत
सांगली

सांगलीत पत्रकार संवाद यात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत

August 16, 2024
झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर
सांगली

झरेतील प्राध्यापक रामराज यादव शिक्षण संस्थेच्या विरोधात का बसणार उपोषणाला … पहा बातमीत सविस्तर

August 14, 2024
एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.
सांगली

एम आय डी सी मंजूर करा _जागा सुचवतो एम आय डी सी द्या._मनसे नेते राजेश जाधव.

August 3, 2024
इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान
सांगली

इंजि.सुशांत माळी यांची डेप्युटी इंजिनियर पदी निवड.. अध्यक्ष तानाजीराव पाटील यांच्या हस्ते सन्मान

August 3, 2024
Next Post
भजनी मंडळ , वारकऱ्यांच्या उपस्थितीत गोपीचंदगडावर वृक्षरोपन

भजनी मंडळ , वारकऱ्यांच्या उपस्थितीत गोपीचंदगडावर वृक्षरोपन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • आटपाडीतील तलावातील विद्युत पंपाच्या केबलची चोरी 50–60 शेतकऱ्यांना फटका, लाखोंचे नुकसान!केबल चोरीची तिसरी घटना, पोलिसांच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष
  • आज जागतिक वारसा दिन – वर्ल्ड हेरिटेज डे
  • विद्याताई मोटे यांचे नाव विधानपरिषदेसाठी आघाडीवर..
  • प्रवीण काकडे यांना श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर समाजसेवा पुरस्कार प्रधान

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)