सुदंर विचारांची जोपासना हीच खरी उपासना – आर.एस.चोपडे
अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्थेची ऑनलाईन व्याख्यानमाला.
जीवनातील खरे सुख कोणत्याही वस्तू मध्ये नसून ते आपल्या मनातील विचारामध्येच आहे.मनाची उन्नती झाल्याशिवाय आनंद,सुख मिळणार नाही,त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सुदंर विचारांची जोपासना करणे आवश्यक असल्याचे मत महाराणीदेवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्थेचे चेअरमन व जीवन विद्या मिशन सांगलीचे ख्यातनाम व्याख्याते आर.एस.चोपडे यांनी व्यक्त केले.
संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर सर्व सेवकासाठी आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानमालेतील पंचेचाळीसावे पुष्ष गुंफून”आरोग्य तणाचे व मनाचे”या विषयावर मार्गदर्शनपर बोलत होते.
सदगुरू वामनराव पै.यांचे विचार समाजात रुजवून संपूर्ण विश्वाच्या सुखाची गुरूकिल्ली असणारे जीवन विद्येचे ज्ञान समाज पर्यंत पोहचविण्यासाठी शिक्षण संस्थे मार्फत दर रविवारी ऑनलाईन व्याख्यान मालिकेचे आयोजन करण्यात येत आहे.
पुढे बोलतान चोपडे सर म्हणाले की,ज्या गोष्टीतून आपल्याला दुख,वेदना,त्रास होतो. अशा अनिष्ट गोष्टी पासून प्रत्येकाने दूर राहणे आवश्यक आहे.त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या विचारावर लक्ष ठेवणे तितकेच महत्त्वपूर्ण आहे.कारण विचारावरतीच जीवनाची दिशा आणि दशा अवलंबून असते.संपूर्ण शरीरात मनाचा संचार असतो.आपल्या मनाला स्थिर करता येणे आवश्यक आहे.त्यासाठी मनातील व्देष, मत्सर,राग,लोभ,अंहकार,गर्व,इर्षा,या गोष्टींना वेळीच बाजूला करणे आवश्यक आहे.
या गोष्टींमळे मन अशुद्ध होते आणि जीवन दुखमय मार्गाने मार्गक्रमण करण्यास सुरूवात करते.हे थांबविण्यासाठी आपले मन विशाल,व्यापक,विनयशील बनवून सुदंर विचाराची जोपासना करून आचरणात आणण्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे.
चैतन्य सुध्दा चांगले मन आणि चांगले शरीर या ठिकाणीच राहते.शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी शरीराची जपवणूक करून प्रत्येक गोष्टीतील मर्यादा ओळखून निर्सग नियमानुसार वर्तन करणे क्रमप्राप्त आहे.
परमेश्वर शोधत बसण्यापेक्षा तुमच्यातील जीवंत परमेश्वराकडे लक्ष देणे गरजेचेच आहे.आपले शरीर साक्षात परमेश्वर आहे.पंचमहाभूतांचा अंश आपल्या शरीरात आला आहे.शरीरातील प्रत्येक अवयवा मध्ये चैतन्य शक्ती आहे.ती शक्ती आपल्या शरीराला चालविण्याचे काम करीत असते.त्यामुळे जीवंत परमेश्वरला योग्य नैवध्य दिला पाहिजे,कारण अनिष्ट नैवध्य दिल्यास त्याचे परिणाम सुध्दा अनिष्टच होणार याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजेत.
शरीरातील अवयवांचे महत्व वेळीच समजावून घ्या,अन्यथा त्रास सुरू झाल्यानंतर जागे व्हाल तर त्याचा काही उपयोग होणार नाही.शरीरा कपड्याने,दागिन्याने सुदंर दिसणार नाही,त्याला चांगला आहार,व्यायाम,चांगले संस्कार देणे आवश्यक आहे.परमेश्वर सुध्दा चांगल्या शरीरात व सुंदर विचारांची जोपासना केली जाते,आशाच ठिकाणी वास्तव्य करतो,हे आपण कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
ज्याचे चुकेल त्याला माफ करा,अंहकार बाजूला ठेवा,कामावर प्रेम करा असे आवाहनआर.एस चोपडे यांनी केले.
हे व्याख्यान फ्री कॉन्फरन्स काॅल ऑप वरून ऑनलाईन घेण्यात आले.हे व्याख्यान यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या व्हा.चेअरमन श्रीमती एल.टी शेंडगे,सचिव एस.ए.पाटील,खजिनदार एस.व्ही.अनुसे, संचालक डी.ए.वाघमोडे, बी.पी.सरगर,प्रशांत स्वामी,अशोक पडळकर,प्रवीण स्वामी,रवींद्र शेंडगे आदीसह सर्व संचालक व मुख्याध्यापक यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रशांत स्वामी यांनी केले







