जत तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मान्सूनच्या हलक्या सरी..
माणगंगा न्यूज:-
जत शहरासह पश्चिम भागात मान्सून पावसाच्या गेल्या दोन दिवसापासून तुरळक सरी कोसळत आहेत.सामुळे खरीपाच्या पिंकाना फायदा होत आहे.तालुक्यात मान्सून पुर्व पावस झोडपत असतो,मात्र तशा अर्थाने मान्सून पाऊस कमी प्रमाणात येत असतो.तुरळक सरी कोसळतात.गत वर्षापासून मान्सूनच्या पावसाचे जत तालुक्यातही आगमन होत आहे.
गेल्या दोन दिवसात तीन-चार वेळा हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे.ग्रामीण भागात या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.तर जत शहरात अनेक रस्ते डबकेयुक्त,राडेराड झाले आहेत.नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे नैसर्गिक नियम सोडून झालेले रस्ते नाले झाले आहेत.तर काही रस्त्यावर पाणी वाहून जाण्यासाठी उतार नसल्याने
रस्त्यावरचं पावसाच्या पाण्याचा डोह तयार होत आहे.