दोन ट्रकची पाच्छापूरजवळ समोरासमोर धडक!
ट्रकचालक जागीच ठार;दोघे गंभीर जखमी
माणगंगा न्यूज पोर्टल जत:-
विजापूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावर पाच्छापूर फाट्यानजीक शनिवारी दुपारी दोन ट्रकच्या झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. दोघेजण जखमी झाले. सिद्धेश्वर मधुकर इंगवले (वय २२, पाठकळ, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. एका जखमीला मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,विजापूरच्या दिशेने मालवाहतूक ट्रक जात होता. दुसरा ट्रक जतकडे येत होता.दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाली.दोन्ही ट्रकचा चक्काचूर झाला.एका ट्रकचा चालक जागीच ठार झाला. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमी व ठार झालेल्या व्यक्तीला बाहेर काढले.जेसीबीने दोन्ही ट्रक बाजूला केले.







