वापरलेल्या जुन्या वस्तू गरजूंना भेट देण्यासाठी युवकांनी तयार केले ‘पुणे डोनेट हँड अँप’
-आपल्याकडील वापरलेल्या जुन्या वस्तू गरजूंना मदत देण्यासाठी पुण्यातील युवकांनी ‘पुणे डोनेट हँड’नावाचे मोबाईल अँप तयार केले आहे.सदर अँप गुगल प्लेस्टोअर मध्ये उपलब्ध असून जास्तीत जास्त पुणेकरांनी अँप डाउनलोड करावे असे आवाहन कार्यक्रमाचे उदघाटक अविनाश निमसे यांनी केले आहे.
पुणे व पिपंरी चिंचवड शहरातील नागरिकांनी वापरलेली पुस्तके,फर्निचर, मोबाईल फोन, संगणक,सायकली इतर गरजूंना भेट देण्यासाठी व गरजूं नागरिक,विद्यार्थी यांना मागणीसाठी पुणे डोनेट हँड अँपचे कर्वेपुतळा येथे लोकार्पण करण्यात आले.पुणे शहरातील युवक प्रवीण महाजन यांनी अँपची निर्मिती केली आहे.पारदर्शक स्वरूपातले हे अँप असून पूर्णपणे सुरक्षित आहे.नागरिकांनी नोंदणी केल्यानंतर वस्तू घेण्यासाठी पुणे डोनेट हँडचे स्वयंसेवक आपल्याशी संपर्क करून वस्तू प्राप्त करतील व गरजूंना पोहच करतील असे अँपचे निर्माते प्रवीण महाजन यांनी सांगितले. अँपच्या लोकार्पणप्रसंगी श्रीमती स्नेहल निमसे,इंजि.सचिन म्हसे,मयूर बागुल,वक्ते प्रवीण शिंदे,प्रियंका चौधरी,अभिषेक अवचार यांच्यासह युवकमित्र उपस्थित होते.