काँग्रेस युवा नेते जयदीप भोसले यांच्या हस्ते आशा सवयंमसेविकाना छत्रीचे वाटप
आटपाडी तालुक्यातील आशा स्वयंसेविका यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्री चे वाटप करण्यात आले. काँग्रेस नेते मोहनराव जी कदम, डॉक्टर शिवाजीराव कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नामदार डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे युवा नेते जयदीप भैया भोसले यांच्या हस्ते विश्वजितेश फौंडेशनच्या माध्यमातून आशा स्वयंसेविका यांना छत्रीचे वाटप करण्यात आले.
सर्वत्र कोरोनाचे आव्हान असताना आता मान्सूनही दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर “आरोग्यदूत” म्हणून आशा सेविका प्रत्येक गावात फिरुन लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत. खऱ्या अर्थाने आरोग्य व्यवस्थेचा कणा म्हणून आशा सेविका आपली भूमिका पार पाडत आहेत.
आटपाडी तालुक्यातील आशा सेविकांना छत्री वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आटपाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डी एम पाटील ,खानापूर आटपाडी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष जयदीप (भैया) भोसले, महाराष्ट्र युवक काँग्रेस सरचटणीस .इंद्रजित साळुंखे,.डॉ’उमाकांत कदम , शिवाजी तात्या पाटील,अॅड विलासराव देशमुख, अध्यक्ष-राहुल गायकवाड,पं स सदस्य सारिका भिसे,मार्केट कमिटी सदस्य- विजय पुजारी,व्हाईस चेअरमन- शशिकांत देठे, युवा नेते- किरण पवार,मा.सचिन पुजारी, विठ्ठल ढोबळे,शिवाजी दबडे, अनिल वाघमारे,रुपेश गायकवाड, संजय खटके,देविदास शिंदे, सरपंच सदाशिव ढगे,माणिकराव सुरवंशी,दत्तात्रेय पाटील,मोहन खरात , यांच्यासह विश्वजितेश फौंडेशनचे पदाधिकारी, आशा माता-भगिनी व कार्यकर्ते उपस्थित होते.







