पलूस येथे झाली संवाद बैठक
अखिल भारतीय पातळीवर विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्या आरक्षणाच्या प्रश्नावर कायदेशीर लढा देणारे कर्नाटक राज्यातील बेळगावचे सुप्रसिद्ध वकील व रामोशी बेरड बेडर समाजाचे राष्ट्रीय नेते मा. एडवोकेट सुरेश दोस्ती साहेब यांनी विविध राज्यातून आरक्षणाच्या प्रश्नावर आपण केलेले प्रयत्न व लोकांच्या कडून येणाऱ्या सूचना,लोकांची मते आजमावण्यासाठी ‘आरक्षणाचा लढा आपल्या दारी’ही मोहीम सुरू केली आहे. सध्या या मोहिमेअंतर्गत एडवोकेट सुरेश दोस्ती साहेब महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात रामोशी समाजाचे प्रश्न समजून घेण्यासाठी विविध संघटनांच्या पदाधिकार्यांशी चर्चा करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पलुस जिल्हा सांगली येथे “आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र” या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत पलूस च्या शासकीय विश्रामगृहावर संवाद बैठक झाली. या संवाद बैठकीला संघटनेचे राज्य निमंत्रक मारुती शिरतोडे, राज्याध्यक्ष दगडू जाधव, राज्य उपाध्यक्ष सुनिल दलवाई, राज्य सरचिटणीस हिम्मतराव मलमे,सोशल मीडिया प्रमुख महेश मदने ,पलूस शहर शाखेचे सचिव अनिल जाधव, युवक आघाडीचे सागर पाटोळे विक्रम सिंह शिरतोडे,रामोशी समाजातील ज्येष्ठ नेते बाबुराव जाधव ,तासगाव येथील विमित शिरतोडे, रावसाहेब शिरतोडे तसेच सांगली येथील प्रकाश नाईक आदी पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या संवाद बैठकीत एडवोकेट सुरेश गस्ती यांनी आरक्षणाचा लढा आपण कसा पुढे नेऊ शकतो याविषयी माहिती दिली.या वेळी विठ्ठल जाधव, गणेश पाटोळे, प्रा. आनंदराव जाधव यांचेसह एडवोकेट सुरेश गस्ती यांचे टीम मधील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.







