सांगली जिल्हापरिषदेच्या स्विय सहाय निधीतून केलेल्या कामात गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार
वंचित बहुजन आघाडीचा आरोप…
सांगली
दि. १८ ऑक्टोबर २०२१
सन २०१८ या काळात जिल्हा परिषद स्वीय सहाय निधीतून जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीचे नुतनीकरण करण्यात आले आहे. सदर मुख्य इमारत एकच असून अंदाज पत्रकात सदर इमारतीचे वेगवेगळे तीन भाग दाखविणेत येऊन त्याकरिता वेगळा निधी दाखविणेत आला आहे. त्याचप्रमाणे सर्व कामे एकाच सोसायटीस देणेत आले आहेत. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या वरवरील काम वाटपात अन्याय केलेला आहे. सदर कामामध्ये तक्ता क्र. १ मध्ये जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये फरशी बसवण्याचे काम असताना त्याठिकाणी सदर इमारती मधील जुनी फरशी काढून जमिनीचे लेव्हलींग करून नवीन फरशी बसविनेचे असताना ठेकेदाराने जुन्या फरशी वरच नवीन नामंजुर केलेले फरशी बसविण्यात आली आहे. सर्व फरश्या खराब असून लेवलींग केलेली नाही.
त्यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्याचप्रमाणे तक्ता क्र. २ नुसार जिल्हा परिषद इमारतीचे रंगरंगोटी व इतर दुरुस्ती करणेचे असताना ठेकेदाराने तक्ता न. २ प्रमाणे कोणतेही कामकाज न करता जिल्हा परिषदे कडील अधिकारी व पदाधिकारी यांच्या संगनमताने न केलेल्या कामाचे बिल काढून रकमेचा अपहार व भ्रष्टाचार केलेला आहे. तसेच तक्ता क्र. ३ नुसार शौचालय दुरुस्ती करणेचे असताना त्याठिकाणी ठेकेदाराने कोणतेही दुरुस्तीचे काम न करता बिल काढले आहे. वरील सर्व कृत्यामध्ये ठेकेदार, जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांचा सहभाग आहे. सर्वांनी आपसात संगनमत करून शासकीय निधीचा गैरव्यवहार करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. त्याचप्रमाणे सन २०१८-१९ या काळात जिल्हा परिषद मुख्य इमारतीच्या इलेक्ट्रिक साहित्य खरेदी देखभाल, दुरुस्ती करिता ३८ लाख इतका खर्च केलेचे दाखविले आहे. या कामात ही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.
तरी आपण स्वतः लक्ष घालून चौकशी करून संबधित ठेकेदार अधिकारी, पदाधिकारी यांचे विरूध्द ८ दिवसात कायदेशीर कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सदर घटने विरूध्द प्रशासना विरूध्द दि. २५ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या मुख्य दरवाजा समोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, जिल्हा महासचिव (दक्षिण) उमरफारूक ककमरी, जिल्हा उपाध्यक्ष (दक्षिण) चंद्रकांत खरात आदी उपस्थित होते.







