आढे येथे कृषी संजीवनी मोहीम
शिरपूर तालुक्यातील आढे,पिंप्री,जैतपुर,वाठोडा येथे शिरपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने २१ जून ते १ जुलै दरम्यान कृषी संजीवनी मोहिमाचे आयोजन करण्यात येत आहे. आढे येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नुकतेच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकासो माजी चेअरमन इंद्रसिंग जमादार होते.प्रमुख अतिथी म्हणून क्षत्रिय शिवराणा कृषी मंडळाचे अध्यक्ष तथा पोलीस पाटील राजकिरण राजपूत,उपसरपंच योगेश पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रसिंग गिरासे,माजी उपसरपंच दगडू पाटील,कृषी सहायक डि.बी.गिरासे,एन.ए.महाजन,किरण पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंडळ कृषी अधिकारी विशाल मोटे यांनी महाडीबीटी PMKSY कृषी यांत्रिकीकरण योजना,MREGS फळबाग लागवड,नाडेप आणि वर्मिकम्पोस्ट याविषयी माहिती दिली.
कृषी सहायक व्ही.डि.गोसावी यांनी विकेल ते पिकेल याविषयी माहिती दिली.कृषी सहायक शिवराज माळी यांनी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक याविषयी माहिती दिली.सुधीर पाटील यांनी जमीन सुपीकता निर्देशांक नुसार खत व्यवस्थापन करून खतांची बचत याविषयी माहिती दिली.
कृषी सहायक नवनीत पाटील यांनी कापूस व मका पिकावरील कीड व रोग नियंत्रण या विषयांवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमात गावातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कार्यक्रम यशवितेसाठी कृषी अधिकारी कार्यालय शिरपूर येथील कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.