आशा स्वयंसेविकांच्या संपाबाबत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठक घेतली. ‘आशां’ना १ जुलै २०२१ पासून १००० रुपये निश्चित मानधनवाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता देण्याचा निर्णय झाला. संप मागे घेत असल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीनंतर जाहीर केले.