दिग्दर्शक भिमराव मुढे यांचा भारततात्या पाटील, आनंदरावबापू पाटील यांच्या हस्ते आटपाडीत सत्कार.
आटपाडी दि . ६ (प्रतिनिधी )
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बार्डो चित्रपटाचे दिग्दर्शक, आटपाडी तालुक्यातील मुढेवाडी गावचे सुपुत्र मा . श्री . भिमराव मुढे
यांचा आटपाडी येथील सामाजीक कार्यकर्ते अशोक लवटे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुक्याचे नेते भारततात्या पाटील यांच्या हस्ते सत्कार करणेत आला . यावेळी माणगंगा उदयोग समुहाचे संस्थापक, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ट नेते आनंदरावबापू पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राज्याचे महासचिव सादिक खाटीक , अशोक लवटे, सागर हजारे ,सिध्देश्वर लवटे, मोहन हजारे ,अतुल यादव, दगडू काळे ,दतात्रय जाधव, काकासाहेब जाधव, रामभाऊ जाधव, साहील वंजारी इत्यादी अनेक जण उपस्थित होते .
माणगंगा उदयोग समुहाचे संस्थापक, राष्ट्रवादी काँग्रेसचे खानापूर – आटपाडी मतदार संघाचे ज्येष्ट नेते आनंदरावबापु पाटील यांच्या निवासस्थानी ही दिग्दर्शक भिमराव मुढे यांचा आनंदरावबापू पाटील यांच्या हस्ते सत्कार करणेत आला . यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राज्याचे महासचिव सादिक खाटीक , राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आटपाडी तालुका अध्यक्षा अश्विनी कासार – अष्टेकर, इंजिनीयर मनोज पाटील, सागर हजारे, कुर्बानहुसेन खाटीक, साहील वंजारी हे उपस्थित होते .







