संजय खरात राज्यस्तरीय लोकशाहिर आण्णाभाऊ साठे शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित.
साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे मानवविकास संस्थेच्या वतीने देण्यात येणारा लोकशाहिर आण्णाभाऊ साठे शिक्षकरत्न पुरस्कार -2021 हा मानाचा पुरस्कार जि. प. शाळा वडगाव ता. माण येथील मुख्याध्यापक व घरोघरी शाळा उपक्रमाचे प्रणेते श्री. संजय खरात यांना वैष्णवी मंगल कार्यालय,माजलगाव जि.बीड येथे झालेल्या एका शानदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
सदरचा पुरस्कार जागतिक किर्तीचे जेष्ठ विचारवंत तथा 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस साहेब यांच्या शुभहस्ते व मा.प्रकाशदादा सोळंके साहेब माजी राज्यमंत्री तथा आमदार माजलगाव,माजी शिक्षक आमदार डी. के. देशमुख साहेब मानवी हक्क आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. मिलिंद आवाड साहेब ,सौ.सबनीस मॕडम आणि आयोजक मा.श्री सुमंत गायकवाड सर या महान विभूतीच्या प्रमुख उपस्थितीत मा. संजय खरात यांना आकर्षक ट्रॉफी, सन्मानपत्र, साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी विशेषांक तसेच नामांतर हा काव्यसंग्रह देऊन सन्मानित करण्यात आले .
मानव विकास संस्थेच्या वतीने राज्यभरतील शिक्षकांचे प्रस्ताव मागवून त्यापैकी 16 शिक्षकांची निवड लोकशाहीर आण्णाभाऊ साठे शिक्षकरत्न पुरस्कारासाठी करण्यात आली होती.
खरात सरांनी आजपर्यंत केलेले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम तसेच कोरोना काळातही 100% विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभाविपणे सुरु ठेवणाऱ्या 'घरोघरी शाळा' या नावीन्यपूर्ण उपक्रमाची स्वकल्पनेतून निर्मिती करुन महाराष्ट्रातील अनेक शिक्षकांना सदर उपक्रमाविषयी केलेले मार्गदर्शन अशा विविध कार्याची दखल घेवून त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संजय खरात सरांना मिळालेल्या या राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराबद्दल जिल्ह्यातील व राज्यातील विविध अधिकारी व पदाधिकारी तसेच ‘घरोघरी शाळा’ हा उपक्रम राबवणाऱ्या राज्यातील सर्व शिक्षकांनी संजय खरात सरांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.